आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हसनापूर येथील शेतकऱ्याची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उरळ - बाळापूरतालुक्यातील हसनापूर येथील वासुदेव अर्जुन राऊत (वय ७०) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे कंटाळून शेतात विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. वासुदेव राऊत यांच्याकडे अडीच एक्कर शेती आहे. ४० हजार रुपये कर्ज काढून शेतामध्ये बोअरवेल केली. मात्र, पाणी लागले नाही. त्यामुळे चिंतेतून त्यांनी स्वत:च्या शेतामध्ये जाऊन विष घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच उरळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मर्ग दाखल केला. पुढील तपास जमादार दादाराव लिखार पोलिस मोरे करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...