आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी पीक विम्याची प्रतीक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - खरीप हंगामातील पेरण्या पावसानंतर सुरू होणार आहेत. शेती मशागती झपाट्याने आटोपल्या जात आहेत. शेतकरी बी-बियाणे खते खरेदी करताना दिसत आहेत. शेतकऱ्यांचे पेरणीचे नियोजन सुरू अाहे. परंतु, पेरणीपूर्वी पीक विम्याची रक्कम पदरी पडावी, अशी अपेक्षा गतवर्षीच्या हंगामात सर्वच पिकांचे उत्पादन घेतलेले तसेच त्या पिकांचा विमा उतरवलेले शेतकरी व्यक्त करत आहेत.
गत खरीप रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पिकांचा विमा बँकेत भरलेला आहे. ही रक्कम भरताना त्यांना पीक विम्याचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा होती. शेतकरी सतत काही वर्षांपासून नापिकीचा घटत्या पीक उत्पादनाचा सामना करत आहेत. अशातच मागील शेती हंगाम जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या पोषक ठरला नाही. मान्सून सक्रिय झाल्यामुळे गतवर्षी खरिपाच्या पेरण्या उशिरा झाल्या होत्या. त्यामुळे मूग उडदाचा पेरा हजारो हेक्टरात घटला होता. बहुतांश कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांनी मूग पेरून त्याचे उत्पादन होणार नसल्याचे लक्षात येताच हे पीक मोडले होते. त्यानंतर सोयाबीनने शेतकऱ्यांना आर्थिक फटका दिला होता. क्विंटलने होणारे उत्पादन किलोप्रमाणे झाले. शेतकऱ्यांचा या पिकावरील मशागतीचा खर्चसुद्धा निघू शकला नाही, असा बहुतांश कोरडवाहू शेती करणाऱ्यांना अनुभव आला होता. कपाशीच्या पिकानेसुद्धा घटत्या पर्जन्यमानाचा सामना केला. त्यामुळे कपाशीचे उत्पादन कमी त्यातच कापसाला मिळणारा प्रती क्विंटलचा भाव परवडणारा होता. परतीचा पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे उत्पादन घटले होते. शेतकऱ्यांनी या दोन्ही हंगामातील विविध पिकांचा विमा हप्ता आर्थिक संरक्षणाकरिता बँकेत भरला होता. काही ठिकाणी सोयाबीन पिकाच्या विम्याची रक्कम अद्यापही राष्ट्रीयकृत बँकेत जमा झाली नाही. परंतु, आता या वर्षीचा खरीप हंगाम समोर येऊन ठेपला असतानासुद्धा शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमेचा लाभ मिळत नसल्याची यासंदर्भातली संपूर्ण चर्चा शेतकरी करत आहेत. बँकेत चकरा मारून खात्यात विम्याची रक्कम जमा झाली काय, याबाबत शेतकरी विचारणा करत आहेत. शासनाने दुष्काळी स्थितीचा समोरील शेती हंगामाचा विचार करता लवकर ही रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. यासोबतच अनेक महसूल मंडळातील विविध पिके पीक विम्यातून वगळल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून सर्वच पिकांच्या विम्याचा लाभ मिळावा, अशी मागणी होत आहे.

राष्ट्रीय बँकांनी सोयाबीनच्या विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली नाही. शासन एकीकडे कर्ज पुनर्गठन जाहीर करते. परंतु, खरीप रब्बीचा पीक विमा रक्कम तत्काळ देत नाही. सर्वच पिकांच्या विम्याची रक्कम शासनाने द्यावी, अशी मागणी कुटासाचे शेतकरी कपिल ढोके यांनी केली.

पीक विमा योजना २०१५-१६ बाबत जिल्हा परिषद कृषी विभागाला गुरुवारपर्यंत वरिष्ठ पातळीवरून गाइडलाइन्स प्राप्त झाल्या नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विम्याची रक्कम केव्हापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल यासंदर्भातले आदेश आल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...