आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी 85 घरांत केली चौकशी; अखेर बापच निघाला मुलीचा खुनी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - ‘कानूनके हाथ लंबे होते है’ याचा प्रत्यय पोलिसांनी चिमुकलीच्या हत्येप्रकरणात दिला. १० दिवसांपूर्वी पाच वर्षीय आलियाचा मृतदेह पोत्यात बांधून फेकलेल्या अवस्थेत डंपिंग ग्राऊंडवर आढळून आला होता. या हत्याकांडाचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.
 
दरम्यान पोलिसांनी परिसरातील ८५ घरांमध्ये अहोरात्र जाऊन विचारपूस करुन या मुलीच्या खून प्रकरणाचा तपास केला. तसेच या खून प्रकरणाशी संबंधित असलेल्या १०० च्यावर संशयित व्यक्तींची चौकशी केली. हे सर्व प्रयत्न झाल्यानंतर मुलीच्या वडिलांवर पोलिसांच्या संशयाची सुई गेली त्याला त्यांनी पोलिस खाक्या दाखवताच तोच मुलीच्या हत्येतील आरोपी असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे आपल्या हरवलेल्या मुलीचा तपास कुठपर्यंत आला, याची विचारणा तो ठाण्यात जाऊन तेथील पोलिसांना करीत होता.
 
नायगाव येथील संजय नगरातील पाच वर्षीय आलिया परवीन ही शुक्रवारी सप्टेंबर रोजी बेपत्ता झाली होती. या प्रकरणी तिच्या आईने अकोट फैल पोलिस ठाण्यात येऊन आपली मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली होती. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी वायरलेसवरून जिल्हाभर तसा मॅसेजही दिला होता. त्यानंतर शनिवारी सकाळी आलियाचा मृतदेह पोत्यात बांधलेल्या स्थितीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. पोलिसांनी या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल केला करून त्याचा तपास सुरु केला. मात्र पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यात अनेक अडचणी येत होत्या.
 
अखेर पोलिसांनी या प्रकरणी संजय नगरातील जवळपास ८५ घरांमध्ये जाऊन या मुलीच्या खून प्रकरणाचा तपास केला तर या भागातील प्रत्येक भंगार व्यावसायिक प्लास्टिक वेचणाऱ्यांची त्यांनी कसून चौकशी केली होती. त्यातून मुलीचा बाप शेख फिरोज शेख रशिद यानेच तिला मारल्याचे तपासादरम्यान समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. या प्रकरणाचा तपास करताना जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर यांनी अकोट फैल पोलिस ठाण्यात तळच ठोकला होता. त्यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश माने पाटील, ठाणेदार तिरुपती राणे, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे, पोलिस उपनिरीक्षक फेरन अकोट फैलच्या डीबी पथकाने केला.
 
या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी विशेष करून ठाणेदार तिरुपती राणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांचे मुलीच्या खूनप्रकरणी केलेल्या तपासाविषयी कौतूक करून त्यांना रिवॉर्ड देणार असल्याचे या वेळी जाहीर केले.

पोत्यावरून पोलिसांनी लावला आरोपीचा शोध
आलियाचा मृतदेह हा पोत्यात बांधलेल्या अवस्थेत होता. यावेळी तिच्या शरीरावर कपडे नव्हते. त्यामुळे तिच्यावर अत्याचार झाला असावा, अशी शंका होती. मात्र पोलिसांनी तपास केला असता ज्या पोत्यात आलियाचा मृतदेह होता. तसेच दुसरे पोते तिच्या घरात दिसून आले. मृतदेह पोत्यात भरताना तिच्या ड्रेसला नाडा नसल्याने ताे खाली घसरला आणि ती नग्नावस्थेत दिसून आली होती. अखेर पोलिसांच्या सखोल तपासात तिच्या आईने पोलिसांना मुलीच्या बापाकडे बोट दाखवले होते.
 
आरोपी पोलिस ठाण्यात येऊन म्हणत होता, मुलगी सापडली का?
मुलगी हरवल्यानंतर तिच्या आईने पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली. दुसऱ्या दिवशी मुलीचे वडिल शेख फिरोज शेख रशिद हा पोलिस ठाण्यात आला माझी मुलगी सापडली काय म्हणून विचारू लागला. तिकडे त्याचा मुलगा प्लास्टिक वेचण्यासाठी गेला अन् त्याला बहीण आलियाचा मृतदेह दिसला. यावरून त्याच्यावरील संशय बळावला होता.
 
आलियाने हट्ट केल्याने बापाने मारले
आलियाचा मृत्यू तोंड दाबल्याने डोक्याला गंभीर इजा झाल्यानेे झाल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले. आलियाने वडिलांकडे हट्ट केला. या वेळी तो नशेत होता. त्याचा त्याला राग आला, त्याने तिचे तोंड दाबले ढकलले. ती जोरात आदळल्याने तिचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने पोत्यात तिचा मृतदेह टाकून तो डंपिंग ग्राऊंडवर फेकून दिला.
 

आरोपीवर आहेत चोरीचे गुन्हे : आरोपीवर खिसे कापू आणि चोरीचे अनेक गुन्हे रेल्वे पोलिसात दाखल आहेत. तो व्यसनाधीन असल्याने त्याचे कुटुंबीयसुद्धा त्याला त्रासले होते, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दिली.
 
बातम्या आणखी आहेत...