आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलासाठी वनौषधी आणण्यासाठी गेलेल्या पित्याचा करुण अंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - नेहमी प्रमाणेसंजयने मंगळवारी सकाळी ऑटो काढला. आधीच ऑटो स्टॉपवर ऑटो नंबरमध्ये उभे असल्यामुळे त्यांनी ऑटो रांगेत उभा केला आणि आपला नंबर येण्याचा अंदाज घेत मुलासाठी वनौषधी आणण्यासाठी जवळच असलेल्या शेताच्या दिशेने निघाला. वीज प्रवाह असलेल्या कुंपणाला त्यांचा स्पर्श होताच जागीच संजय यांचा मृत्यू झाला.
संजय नथ्थूजी देवतळे (३५) रा. बाभुळगाव असे करुण अंत झालेल्या दुर्दैवी पित्याचे नाव आहे. आईवडिलांना एकुलता एक असलेला संजय यांचा सकाळी वाजताच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला. संजय देवतळे ऑटो चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मंगळवारी सकाळी वाजता संजय घरून ऑटो घेऊन निघाले होते. ऑटो स्टॉपवर आल्यानंतर त्यांनी नंबरमध्ये ऑटो उभा केला आणि तेवढ्या वेळात आपण मुलासाठी वनौषधी घेऊन येऊ म्हणून ते शेजारीच असलेल्या शेताच्या दिशेने गेले. या वेळी शेतातील कुंपणावर विजेचा तार तुटून पडलेला होता. त्यामुळे सर्व कुंपणात वीज प्रवाह आलेला होता. त्या कुंपणातून जाण्याचा प्रयत्न केला असता संजय यांना जोरदार शॉक बसल्यामुळे ते कुंपणातच अडकून त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती सिव्हिल लाइन्स पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन संजय यांचा मृतदेह तारेतून काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी पोलिस पाटील यांच्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

याच काटेरी कुंपणामध्ये अडकून युवकाचा मृत्यू झाला. या वेळी तणाव निर्माण झाल्यामुळे पोलिस निरीक्षक राजेंद्र माळी यांनी जमावाला शांत केले.

दोन दिवसांपासून तार तुटलेली होती
विजेचीतार दोन दिवसांपासून तुटून ती शेताच्या कुंपणावर पडलेली होती. या घटनेची माहिती महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली होती. मात्र, त्यांनी दखल घेतली नाही, असे काही ग्रामस्थांचे म्हणणे होते. मात्र, दोन दिवसांपासून तार तुटलेली होती की घटनेच्याच दिवशी तुटली, याविषयी माहिती विज वितरण कंपनीकडून मिळू शकली नाही.