आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीची भेट घेऊन आलेल्या पित्याचा पिंपरडोलीजवळ आढळला मृतदेह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृतदेह आढळल्यानंतर नागरिकांनी अशी गर्दी केली होती. - Divya Marathi
मृतदेह आढळल्यानंतर नागरिकांनी अशी गर्दी केली होती.
आलेगाव- आपल्या मुलीच्या सासरी जाऊन तिची भेट घेतल्यानंतर गावाकडे परतताना अंधार सांगवीच्या एका पित्याचा पिंपरडोली फाट्याजवळ संशयास्पद मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह रस्त्यालगतच्या खदानीत आढळून आला. विश्वनाथ यशवंत ठाकरे वय ५०, असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी चान्नी पोलिस तपास करत आहेत.
मेहकर तालुक्यातील टेंबुरखेडा येथे आपल्या मुलीची भेट घेऊन विश्वनाथ ठाकरे हे आज मेहकरकडून येणाऱ्या वाहनातून पिंपरडोळी फाट्यावर उतरले होते. त्यानंतर पुढे चाेंढी मालेगाव मार्गाने अंधार सांगवीला जाणार होते. मात्र, अचानक त्यांचा मृत्यू झाला. चान्नी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला मृतदेह अकोला येथे शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला अहवालानंतर स्पष्ट हेाईल. दरम्यान, शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी नेण्यात आले असून, त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती आहे.