आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील सांस्कृतिक सभागृहासाठी पंधरा कोटींचा निधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जिल्हासांस्कृतिक कलागुणांनी समृद्ध असला, तरी सांस्कृतिक भवन नसल्यामुळे कलाकारांना व्यासपीठ मिळत नव्हते. तसेच नव्या कलाकारांना वाव मिळत नव्हता. ही बाब लक्षात घेऊन दैनिक दिव्य मराठीने अकोल्यात सांस्कृतिक भवन व्हावे, यासाठी महाअभियान राबवले होते. यात अनेक सामाजिक संस्था संघटनाही सहभागी झाल्या होत्या. याची दखल घेत पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील यांनी पुढाकार घेऊन येथे भव्य सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून १५ कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे.

महाराष्ट्राला कला साहित्याची कर्मभूमी म्हटले जाते. त्यात अकोला जिल्ह्याचा महत्त्वपूर्ण वाटा असून, या जिल्ह्यातील सांस्कृतिक कला क्षेत्रातील कलाकारांनी राज्यातच नव्हे तर राज्याच्या बाहेरही नावलौकिक मिळवला आहे. मात्र, स्थानिक कलाकारांना उत्तम दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे जिल्ह्यातील कलाकारांची कोणतीही अवहेलना होता, त्यांना सोयीसुविधांनीयुक्त असे सांस्कृतिक भवन मिळावे यासाठी पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील यांचे प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना अखेर यश आले असून, सांस्कृतिक भवनाच्या इमारतीसाठी तब्बल १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

सभागृहासाठी निधी मंजूर झाल्यामुळे अाता जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्राला पुन्हा नव्याने उभारी मिळणार अाहे.

सर्व साेयी मिळणार : शहरातबांधण्यात येणाऱ्या सांस्कृतिक सभागृहात सर्व साेयी-सुविधा असणार अाहे. त्यामुळे कलाकारांना त्याचा फायदा हाेणार अाहे.

‘दिव्य मराठी’ने महाअभियानातून वेधले शासनाचे लक्ष
सांस्कृतिकभवनाच्या निर्मितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिव्य मराठीने महाअभियान राबवले होते. या अभियानात सांस्कृतिक चळवळीशी निगडित असलेल्या अनेक संघटनांनी सहभाग नोंदवून पाठिंबा दर्शवला होता, हे विशेष.

जिल्ह्यातील नव्या कलाकारांना वाव
सांस्कृतिकसभागृह झाल्यानंतर सांस्कृतिक कला क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांसह सांस्कृतिक संस्थांना जिल्ह्यातच व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नवीन कलागुणांनाही आता वाव मिळणार, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री डाॅ. पाटील यांनी व्यक्त केला आहे.

रस्ते बांधकामासाठी मिळणार पाच कोटी
अकोलामहापालिका अंतर्गतच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या कामासाठी नगरविकास विभागाकडून पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीतून आता मनपा अंतर्गतच्या या रस्त्यांचा विकास होणार आहे.