आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचवे राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन अकोल्यात 25 पासून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- पाचवे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन दोन दिवस शहरात रंगणार आहे. हे संमेलने बळीराजाला समर्पित केले आहे. स्वराज्य भवन प्रांगणात २५ २६ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या साहित्य संमेलनात राष्ट्रसंतांच्या विचारांचे मंथन होणार आहे, अशी माहिती वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समितीचे अध्यक्ष रामेश्वर बरगट यांनी शनिवारी १८ नोव्हेंबरला शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 


२५ ला योगाचार्य चंद्रकांत अवचार यांच्या मार्गदर्शनात योग प्राणायम शिबिर, संजय गेडाम यांच्या संयोजनात श्री गुरुदेव सेवा मंडळ मोठी उमरी यांचे भजन संमेलन होईल. प्रभात चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष साहेबराव नारे यांच्या हस्ते ग्रंथ पूजन होईल. गोपाल सालोडकर हे संमेलन गीत सादर करतील. कुलगुरु डॉ. विलासजी भाले यांच्या हस्ते ११ वाजता संमेलनाचे उद््घाटन होईल. सोहळ्याला संमेलनाध्यक्ष, स्वागताध्यक्षांसह आचार्य हरिभाऊ वेरुळकर, आमले महाराज, उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, दामोदर पाटील, भास्करराव विघे, रामदास आंबटकर, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष बबनराव चौधरी, डॉ. गजानन नारे, ज्ञानेश्वर रक्षक, मुगुटराव बेले, प्रा. संतोष हुशे यांची उपस्थिती राहील. 


‘आम्ही घडू देशासाठी’ हा परिसंवाद प्रा. डॉ. राजेश मिरगे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. सचिन बुरघाटे अॅड. दिलीप कोहोडे हे प्रमुख वक्ते राहतील. किरण भुयार, रविकुमार काळे, भरत राऊत, नरेंद्र वडोदे, गणेश ठोंबरे, डॉ. संजय तिडके, प्रा. विशाल जाधव यांची उपस्थिती राहिल. स्व. अंबरीश कविश्वर स्मृती प्रित्यर्थ राज्य ग्रामगीता तत्वज्ञान निबंध स्पर्धेचे बक्षिस वितरण रामदास आंबटकर, विनोद मापारी, ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कविश्वर यांचा हस्ते होईल. प्रभात किड्सच्या बाल भजन मंडळाचे भजन गायन होईल. ‘आजच्या युवकांची दशा दिशा’ यावर व्याख्यान होईल. यात प्रा. अविनाश कोल्हे, प्रा.डॉ. हरिदास आखरे मार्गदर्शन करणार आहेत. सामुदायिक प्रार्थना प्रार्थनेचे चिंतन डॉ. भास्करराव विघे करतील. रात्री अॅड. अनंत खेळकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कवी संमेलन होईल. किशोर बळी सूत्रसंचालन करतील. २६ ला अरुण सालोडकर यांच्या मार्गदर्शनात सामुदायिक ध्यान चिंतन होईल. गजानन जळमकार, सुरेश काळे यांच्या संयोजनात वा श्री गुरुदेव बालिका भजन मंडळाचे भजन गायन होईल. 


हरिदास काळे, सचिन निंबोकार, संजय गेडाम, गजानन भिरड, रामधन सिरसाट, गुरुदेव सेवा मंडळ डाबकी रोड यांचे अभंग गायन होईल. बालसाहित्यिकांचे मनोगत या कार्यक्रमात पुर्वा चतारे, ज्ञानेश्वरी माळी, अखिलेश कांगुळकर विचार व्यक्त करतील. आमले महाराज यांचे ग्रामगिता तत्वज्ञान प्रवचन, कीर्तन होईल. ग्रामगीतेतील शेतीविषयक धोरण हा परिसंवाद अॅड. विनोद साकरकार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यात प्रमुख वक्ते म्हणून प्रदीप देशमुख, शिवाजीराव देशमुख, शामराव आपोतीकर मार्गदर्शन करतील अरविंद देठे, श्रीकृष्ण ठोंबरे, संजय चौधरी, गणेश पोटे, सारंग खोडके, मधूकरराव सरप यांची उपस्थिती राहिल. ‘राष्ट्रसंतांना अपेक्षित युवक’ हा परिसंवाद डॉ. सुभाष रत्नपारखी यांच्या अध्यक्षतेखाली होईल. 


यात प्रशांत ठाकरे, स्वप्नील इंगोले, शिवाजी भोसले, श्रीकांत घोगरे प्रमुख वक्ते राहतील. डॉ. अशोक ओळंबे, नीरज आवंडेकर, नीरज खोसला, सुभाष म्हैसने, भा. ना. राऊत, महेश खंडेलवाल, डॉ. दिलीप मानकर, माधवराव सुर्यवंशी, सुनील लांजुळकर, डॉ. शंकरराव वाकोडे उपस्थित राहतील. ‘राष्ट्रसंतांना अपेक्षित महिलोन्नती’ हा परिसंवाद सुधाताई जवंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली होईल. या परिसंवादाची भूमिका प्रा. डॉ. ममता इंगोले मांडतील. या सत्रात कोमल हरणे, कविता येनूरकर, सानिका जुमळे मार्गदर्शन करतील. या सत्राला जि.प. अध्यक्षा संध्या वाघोडे, उज्वला देशमुख, मंगला म्हैसने या उपस्थित राहतील. ‘ग्रामगिता जीवन विकास परिक्षा काळाची गरज’ हा परिसंवाद गुलाबराव खवसे यांच्या अध्यक्षतेत होईल. अशोक कडू गोपाल कडू मार्गदर्शन करतील. घनश्याम पिकले, सुनील देशमुख, अॅड. वंदन कोहाडे उपस्थित राहतील. 


‘राष्ट्रसंतांना अपेक्षित श्री गुरुदेव सेवक’ हा परिसंवाद आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांच्या अध्यक्षतेत होईल. समोरोपीय सत्रात यावेळी संमेलनाध्यक्ष, स्वागताध्यक्ष, पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, डॉ. भास्करराव विघे, माजी राज्यमंत्री सुधाकर गणगणे, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, बालमुकूंद भिरड, गंगाधरराव पाटील, डॉ. पुरुषोत्तम तायडे, अॅड. मोतीसिंह मोहता, महादेवराव भुईभार, अॅड. रामसिंग राजपूत, डॉ. रघुनाथ वाडेकर, किशोर वाघ, देविदास पाटील, दिलीप आसरे, पंकज जायले यांची उपस्थिती राहील. रात्री वाजता सप्तखंजिरीवादक संदीपपाल महाराज यांचे राष्ट्रीय प्रबोधनाने संमेलनाची सांगता होईल. या प्रबोधन सत्रात अक्षयपाल, ऋषिपाल, संघपाल, पंकजपाल यांचा सहभाग राहणार आहे. पत्रकार परिषदेला अॅड. संतोष भोरे, गोपाल गाडगे, राजेंद्र झामरे, ज्ञानेश्वर साकरकर, श्रीपाद खेळकर, डॉ. राजीव बोरकर, प्रा. हरिदास गहूकर, गणेश चोंडेकर, प्रसाद बरगट, विजय वाहोकार यांच्यासह सेवा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. 


कार्यक्रमात यांचा सत्कार 
उद््घाटन सोहळ्यात भजनसम्राट रामभाऊजी गाडगे स्मृती प्रित्यर्थ ‘ग्रामगीता जीवन गौरव पुरस्कार’ ज्येष्ठ प्रचारक दुर्गादासजी रक्षक, मानव सेवाश्रमचे अत्रे महाराज, ग्रामगीता जीवन विकास परिक्षा विभागाचे सचिव गुलाबराव खवसे महाराज, ग्रामगीता प्रचारक रुपरावजी वाघ यांना देण्यात येणार आहे. तसेच स्व. माणिकरावजी जवंजाळ स्मृती प्रित्यर्थ सेवकांचा सत्कारात ग्रामगिताचार्य अॅड. संतोष भोरे यांचा सत्कार होईल. 


सामुदायिक ध्यान, चिंतनाने संमेलनाची होणार सुरुवात 
राष्ट्रसंतविचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान ज्येष्ठ गुरुदेव प्रचारक सत्यपाल महाराज चिंचोळकर यांना मिळाला आहे, तर या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून ज्येष्ठ समाजसेवक कृष्णा अंधारे राहतील. शनिवार, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ५.३० वाजता ग्रामगीता प्रचारक गोवर्धन खवले यांच्या उपस्थितीत सामुदायिक ध्यान चिंतनाने या संमेलनाची सुरुवात होईल. या संमेलनाचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...