आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिग्नल तोडल्यामुळे दोन पोलिसांमध्ये फ्रीस्टाइल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- सिग्नल तोडणाऱ्या पोलिसाच्या विरोधातच कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाने कारवाई केली. त्याचा राग अनावर झाल्यामुळे अडवण्यात आलेल्या पोलिसाने वाहतूक पोलिसालाच मारहाण केली. ही घटना रविवारी सकाळी बसस्थानक चौकात घडली. याप्रकरणी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या तक्रारीवरून पोलिस आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध मारहाण करणे आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. आता हा पोलिस कोठडीची हवा खात आहे.

कायदा सर्वांसाठी सारखा असतो. याची प्रचिती कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी एका पोलिसावर कारवाई करून िदली. बसस्थानक चौकात संजय बळीराम इंगळे हे वाहतूक पोलिस वाहतुकीचे नियमन करीत उभे होते. या वेळी रेल्वेस्थानकाच्या दिशेने सिग्नल तोडून एक दुचाकी जात होती. ती दुचाकी होती वाशीम जिल्हा पोलिस शेखर श्रीधर तायडे याची. आपण पोलिस असताना अडवले म्हणून त्याच्या जिव्हारी लागले. त्यांनी मला कसे अडवले म्हणून संजय इंगळे यांच्याशी वाद घातला आणि त्यांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणला. प्रकरण एवढ्यावरच थांबता पोलिस ठाण्यात पोहोचले. सिव्हिल लाइन्स पोलिसांनी याप्रकरणी वाहतूक पोलिस कर्मचारी संजय इंगळे यांच्या तक्रारीवरून शेखर श्रीधर तायडे आणि त्याचा सोबती उमेश अंबादास तेलगोटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून शेखर तायडे आणि उमेश तेलगोटे यांना अटक केली.