आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत निवडणुकींसाठी ३,०१८ अर्ज झाले दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्यातील२२० ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक आणि ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी निवडणूक नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत हजार १८ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, आज, १७ जुलै रोजी २०७२ अर्ज दाखल झाले आहेत. सोमवार, २० जुलै हा अंतिम तारीख असलेला एकमेव दिवस शिल्लक आहे. त्यामुळे या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गावपुढाऱ्यांचा पोळा प्रत्येक तहसील कार्यालयात भरणार आहे.
ऑगस्ट ते ऑक्टोबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या नियंत्रणात सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदारांच्या मार्गदर्शनात निवडणूक प्रक्रियेच्या कामकाजाचा १३ जुलैपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. १४ जुलैला तेल्हारा, बाळापूर, बार्शिटाकळी, पातूर या तालुक्यातून एकही अर्ज भरल्या गेला नाही. अकोटमधून ३, अकोला १२, मूर्तिजापूरमधून एकच अर्ज दाखल करण्यात आला होता. १५ जुलैपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी सुरू झाली. जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालय परिसरात धावपळ दिसून आली. या दिवशी तेल्हारा तालुक्यात २८, अकोट ४३, बाळापूर २५, अकोला ५४, मूर्तिजापूर ११, बार्शिटाकळी १०, पातूर १२ असे एकूण १८३ अर्ज भरल्या गेले. गुरुवार, १६ जुलैला तर उमेदवारी अर्जांचा पाऊस पडला. तेल्हारा तालुक्यातून ८२, अकोट ९२, बाळापूर ९९, अकोला २१८, मूर्तिजापूर ९१, बार्शिटाकळी १०४ आणि पातूरमधून ६० असे ७४७ अर्ज दाखल झाले. आज, तेल्हारा २२२, अकोट २०४, बाळापूर ३६६, अकोला ५९३, मूर्तिजापूर २४४, बार्शिटाकळी २८१, पातूर तालुक्यातून १६२ उमेदवारी अर्ज आले. शनिवार, १८ जुलैला रमजान ईद आणि रविवार, १९ जुलै साप्ताहिक सुटी आल्याने केवळ साेमवार, २० जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहेत.

दोन दिवस चालणार खलबते : सोमवार,२० जुलै अखेरचा दिवस आहे. या दिवशी कोणाचा अर्ज भरायचा, कोणाचा डमी अर्ज ठेवायचा आणि शिवाय विरोधी गटाकडेही लक्ष ठेवले जाणार आहे. त्यांच्याकडून कोणकोणते अर्ज दाखल होतात आणि त्यांच्या संभावित उमेदवारांसाठी कोण प्रबळ उमेदवार आपल्याकडे राहील, या सर्व बाबींची खलबते या सुटीच्या दोन दिवसांमध्ये चालणार आहेत.

वेळेची मुदत वाढू शकते : अर्जदाखल करण्यासाठी २० जुलै हा अखेरचा दिवस आहे. त्यापूर्वी सलग दोन दिवस सुटी आली, ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबवली जात असल्याने इंटरनेटचा व्यत्ययही आला. अखेरच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता दुपारी वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याच्या वेळेत काही तासांची वाढ आयोगाच्या निर्देशान्वये केली जाऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...