आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहिद जवानांच्या कुटुंबीयांना अार्थिक मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जम्मु-काश्मिरमधील उरी येथील लष्करी मुख्यालयावर झालेल्या दशहवादी हल्लयातील शहिद जवानाच्या कुटुंबीयांना बुधवारी रामनवमी शोभा यात्रा समितीने राेख अार्थिक मदत दिली. या हल्ल्यात अमरावती जिल्हयातील नांदगाव खंडेश्वर येथील रहिवासी विकास उईके हे शहिद झाले हाेते. राष्ट्र रक्षणासाठी सर्वास्वाचा त्याग केलेल्या सैनिकांना नमन करणे, हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन रामनवमी समितीचे सर्वेसर्वा अामदार गोवर्धन शर्मा यांनी प्रसंगी केले.

भाजप पदाधिकारी रामनवमी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी नांदगाव खांदेश्वर येथे जाऊन शहीद उईके परिवाराचे सांत्वन केले. याप्रसंगी अमरावती जिल्हा ग्रामीण भाजपा अध्यक्ष दिनेश सूर्यवंशी हे प्रामुख्याने उपस्थित हाेते. अकोला येथील रामभक्तांचा चमू आमदार. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यांने गरजूंना मदत करीत अाहे. समितीने वर्षभर सातत्याने सेवा करुन विदर्भ सह महाराष्ट्रात आगळी वेगळी अाेळख निर्माण केली अाहे, असे सूर्यवंशी म्हणाले. या वेळी उद्याेजक ब्रिजमोहन चीतलांगे, अमरावती भाजपा महानगर अध्यक्ष जयंत देहणकर, सुनील दळवी, मोहन गुप्ता यांचे हस्ते बेबीताई उईके यांना २५ हजार रुपयांचा निधी सुपूर्द करण्यात आला.

या वेळी समितीचे अध्यक्ष डॉ. संजय सोनवणे, हरीश आलमचंदानी, अरविंद उर्फ बबलू सोनालेवाला, आनंद चांडक, संदीप छावछारीया, बनवारीलाल बजाज, समितीचे कोषाध्यक्ष अशोक गुप्ता, डॉ. अभय जैन, वसंत बाछुका, गिरीराज तिवारी, संदीप वाणी, रविकांत देशमुख, जयेश पटेल, शिवाजीराव पिंपळकर, हरिश्चंद्र पाटील खंडारकर, सुनील दळवी, सुरेखा शिंदे, राजेंद्र धर्माळे, निलेश गायबोले, पुष्पा वानखेडे, मोहन गुप्ता, गिरीश जोशी, अनिल गवई, नितीन जोशी, बाळकृष्ण बिडवाई, शंकर खोवाल,दिलीप मोरे, नवल खिश्ती, विलास वितोंडे, संदीप अंभोरे, प्रमोद पिंजरकर, तात्या सोळंके, उत्तम ब्राह्मणवाडे, आदी उपस्थित होते. संचलन गिरीश जोशी यांनी तर आभार प्रदर्शन गिरीराज तिवारी यांनी केले.
बातम्या आणखी आहेत...