आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fir Against Municipal Corporation Opposition Leader Sajid Khan

पठाण यांच्यासह २५० जणांवर गुन्हे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे, तसेच सभागृहाचा अपमान करून, महापौर, उपमहापौर यांना अश्लील शिवीगाळ करण्याचा आरोप महापालिकेचे विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांच्यावर करण्यात आला आहे, अशी तक्रार महापौर, उपमहापौर यांच्या वतीने नगरविकास सचिव जी. एम. पांडे यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पठाण यांच्यासह भारिप-बमसंचे गटनेता तथा नगरसेवक गजानन गवई नगरसेविका उषा विरक, माजी नगरसेविका वंदना वासनिक यांच्यासह २५० जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी पठाण यांना अटक करून जामीनही मंजूर केला.

महापौर उज्ज्वला देशमुख उपमहापौर विनोद मापारी यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, साजिदखान पठाण, गजानन गवई, उषा विरक, माजी नगरसेविका वंदना वासनिक यांच्या नेतृत्वात कोणतीही सूचना नसताना २०० ते २५० चा जमाव सभेचे कामकाज सुरू असताना घोषणाबाजी करत सभागृहात आला. पठाण यांनी महापौर यांना अश्लील शिवीगाळ केली. काहींनी त्यांच्यावर खिचडी फेकून चप्पलसुद्धा भिरकावली. उपमहापौर यांनासुद्धा शिवीगाळ करून त्यांच्यावर हात उगारला अंगावर धावून जाऊन महापौर उपमहापौर यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावरून पोलिसांनी चौघांसह २५० महिला पुरुषांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांची जामिनावर सुटका केली आहे.

चित्रफितीवरून कारवाई
सभा सुरू असताना यादरम्यान संपूर्ण कामकाजाचे चित्रीकरण केले जाते. त्या चित्रीकरणाचा व्हिडिओ पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्या व्हिडिओवरून कोण काय बोलत होते. तसेच चप्पल भिरकावणारे, खिचडी फेकणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

कामकाज सुरू नाही, तर अडथळा कसा?
सत्ताधारी पक्षाचे आमदार, खासदार आहेत. त्यांचीच खालपासून वरपर्यंत सत्ता आहे. त्यामुळे आमच्यावर गुन्हे दाखल होतील, हे अपेक्षित होतेच. सत्तेचा गैरवापर करून आमच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. जेव्हा सभागृहात इतर लोकं आले तेव्हा सभा सुरूच झाली नव्हती. जर सभाच सुरू नसेल, तर शासकीय कामकाजात अडथळा कसा निर्माण होऊ शकतो. ज्येष्ठ नगरसेवक विजय अग्रवाल यांची भाषाही ज्येष्ठ नगरसेवक पदाला शोभणारी नव्हती.'' साजिदखानपठाण, विरोधी पक्षनेता