आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fire By Cracker; Around 15 Million Material Destroyed

फटाक्यांमुळे आग; १५ लाखांचे साहित्य खाक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - दिवाळीच्या रात्री रेल्वे स्टेशन परिसरातील बाहेती सायकल स्टोअर्समध्ये आग लागून १४ ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाले. बुधवारी शहरात यासह तीन आगीच्या घटना घडल्या.
शिवाजी महाविद्यालयासमोर असलेल्या बाहेती सायकल शोरूमला बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास आग लागली. फटाक्यांमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे. या आगीत लहान मोठ्या सायकलींसह सायकली बनवण्याचे साहित्य जळून खाक झाले. काही युवकांना आग लागल्याचे दिसून आल्याने त्यांनी अग्निशमन विभागाला तत्काळ माहिती दिली. शिवाय रामदासपेठ पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन विभागाचे अधिकारी रमेश ठाकरे सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. प्लास्टिकचे साहित्य अधिक असल्याने आग तर विझवल्या गेली, मात्र साहित्य जळून खाक झाले.

गद्रे मोटर्सला आग
बुधवारी दुपारी ३.३० वाजता शिवणी परिसरातील गद्रे मोटर्सला आग लागून आतील साहित्य जळाले. यामध्ये १० ते १५ हजारांचे नुकसान झाले. याशिवाय आरएलटी महाविद्यालयासमोर डंपिंग ग्राउंडमध्ये फटाक्यांमुळे आग लागली. अग्निशमन विभागाने धाव घेत आग विझवली.