आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोट येथे दुकानाला आग, लाखोंची हानी, बँक वाचली, सुदैवाने जिवित हानी टळली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट- जवाहर मार्गावरील जी महासेल या घरगुती दैनंदिन वापराच्या वस्तु विकणाऱ्या दुकानाला सकाळच्या सुमारास आग लागली. या आगीत लाखो रुपयांचा माल जळल्याचे जी महासेलचे मालक गणेश ताठे यांनी सांगितले. बँक आॅफ इंडीयाची शाखा थोडक्यात वाचली. सुदैवाने आगीमध्ये जिवितहानी झाली नाही. 

आज सकाळच्या सुमारास जी महासेलच्या दुकानातुन आगीच्या ज्वाला येत असल्याचे आजुबाजुच्या नागरिकांना दिसल्या. त्यांनी या घटनेची तत्काळ माहिती पोलिसांना दिली. पोलिस त्वरित घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. मात्र, जी महासेलमध्ये प्लास्टिकच्या वस्तू असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण गेले. अकोटच्या अग्निशमन दलासोबतच तेल्हारा, अंजनगाव, दर्यापूर, येथील गाड्यांना ही पाचारण केले. या सर्व गाड्यांनी मिळून अखेर आग आटोक्यात आणली. पण, तोपर्यंत जी महासेलमधील संपूर्ण माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. 

बँक आँफ इंडिया वाचली
याचइमारतीमध्ये तळमजल्यावर बँक आॅफ इंडीयाची शाखा आहे. पहिल्या मजल्यावरील दुकानाला आग लागली होती. पण, आग तातडीने आटोक्यात आणल्याने बँक आॅफ इंडीयाच्या शाखेला हानी पोहोचली नाही. पण, काळजी म्हणून बँकेतील संगणक कॅश इतरत्र हलवण्यात आली होती. आगीचे वृत्त समजताच ठाणेदार सी. टी. इंगळे, उपनिरीक्षक शरद माळी, नगराध्यक्ष हरीनारायण माकोडे, स्वत:घटनास्थळावर हजर झाले. त्यांनी आग विझवण्यासाठी योग्य त्या सूचना दिल्यात. 

वीज पुरवठा खंडीत
आगलागताच खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील विद्युुत पुरवठा खंडीत केला होता. त्यामुळे फायर ब्रिगेडच्या गाड्यांना पाणी भरण्यासाठी आयटीआयमध्ये सुमारे कि. मी. दूर जावे लागल्याची माहिती आहे.
 
बँकेचेकामकाज प्रभावित: बँकआँफ इंडियाच्या अकोट शाखेचे कामकाज आज प्रभावित झाले. विद्युत पुरवठा खंडीत असल्याने कामाला उशीरा सुरुवात झाली. तसेच वरच्या मजल्यावर पाणी साचले होते. ते पाणी बँकेत गळत असल्यानेही कामकाज प्रभावित झाले. 

वाहतूक काही काळासाठी बंद
आगलागली त्या ठिकाणावरील मार्ग काही वेळेसाठी बंद होता. खबरदारीची उपाययोजना म्हणून ठाणेदार सी. टी. इंगळे पोलिस कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य करून जिवितहानी होऊ नये, याकरिता घटनास्थळापासून नागरिकांना दूर केले त्या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद केली होती. 

वीज पुरवठा खंडीत 
आग लागताच खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील विद्युुत पुरवठा खंडीत केला होता. त्यामुळे फायर ब्रिगेडच्या गाड्यांना पाणी भरण्यासाठी आयटीआयमध्ये सुमारे कि. मी. दूर जावे लागल्याची माहिती आहे. 

बँकेचे कामकाज प्रभावित 
बँक आँफ इंडियाच्या अकोट शाखेचे कामकाज आज प्रभावित झाले. विद्युत पुरवठा खंडीत असल्याने कामाला उशीरा सुरुवात झाली. तसेच वरच्या मजल्यावर पाणी साचले होते. ते पाणी बँकेत गळत असल्यानेही कामकाज प्रभावित झाले. 

वाहतूक काही काळासाठी बंद 
आग लागली त्या ठिकाणावरील मार्ग काही वेळेसाठी बंद होता. खबरदारीची उपाययोजना म्हणून ठाणेदार सी. टी. इंगळे पोलिस कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य करून जिवितहानी होऊ नये, याकरिता घटनास्थळापासून नागरिकांना दूर केले त्या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद केली होती. 

ते १० लाख रुपयांचे नुकसान 
आग नेमकी कशाने लागली हे अद्याप समजू शकले नाही. पण, आग शाॅर्टसर्कीटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे. या आगीत जवळपास ते १० लाख रुपये नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. याबाबत पोलिस ठाण्यातही नोंद करण्यात आली. 

नागरिकांची सतर्कता 
आग लागल्याचे दिसताच नागरिकांनी घरामधील बोरिंग मशीनद्वारे पाण्याचा शिडकावा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. आगीने उग्र रूप धारण केल्याने त्यांनी केलेली व्यवस्था तोकडी पडली. आजुबाजूच्या दुकानदारांनी झटपट आपल्या दुकानातील सामान सुरक्षित स्थळी हलविले. 

शाखाधिकाऱ्यांना ठाणेदारांनी भरला दम 
आग लागल्यानंतरसुद्धा शाखाधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याने ठाणेदार सी. टी. इंगळे यांनी शाखाधिकाऱ्यांना दम भरल्यानंतर त्यांनी हालचाली करून बँकेतील कॅश मुख्य कागदपत्रे सुरक्षित ठिकाणी हलविली. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. 
बातम्या आणखी आहेत...