आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावत्या बसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने लागली आग, चालकामुळे वाचले 38 प्रवासी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- राष्ट्रीय महामार्गावर व्याळा- रिधोरादरम्यान इंजिनमध्ये बिघाड झाल्याने लागलेल्या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाल्याची घटना आज सायंकाळी ५.३० वाजताच्यादरम्यान घडली. घटनेत कुठलीही प्राणहानी झाली नाही. 

बस क्रमांक एमएच २०, बीएल १८३२ ही बस अकोलाकडे जात असताना व्याळा- रिधोरादरम्यान बसच्या इंजिनमध्ये वास येत असल्याने बस चालक सुरेश एकनाथ इंगळे, खामगाव यांनी बस रोडच्या बाजुला उभी केली. बसमध्ये एकूण ३८ प्रवासी प्रवास करत होते. विना वाहक बस असल्याने चालकाने सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. नंतर नंतर इंजिनमधील बिघाडामुळे बसला आग लागली. उन्हाची तिव्रता जास्त असल्याने बसने मोठ्या प्रमाणात पेट घेतला. यामध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली, बसचा सांगडा फक्त शिल्लक राहीला. आग विझविण्यासाठी बाळापूर न. प. अकोला मनपाच्या पाण्याचे बंब बोलवण्यात आले होते. परंतु, बंब पोहोचेपर्यंत बस जळून खाक झाली. 
बातम्या आणखी आहेत...