आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून सुटली गोळी, जठारपेठेतील एटीएमसमोरील दुपारची घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जठारपेठेतील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये पैसे टाकण्यासाठी आलेल्या एजन्सीच्या सुरक्षा रक्षकांच्या बंदुकीतून सफाई करताना गोळी निसटली. गोळीची दिशा खालच्या बाजूने असल्यामुळे ती कुणालाही लागली नसल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना सोमवारी दुपारी वाजताच्या सुमारास घडली. मात्र, या गोष्टीची पोलिस यंत्रणेला कुठलीही भनक लागली नाही. याप्रकरणी पोलिसांमध्ये नोंद करण्यात आली नव्हती.
एचडीएफसी बँकेच्या शाखेसमोर असलेल्या एटीएममध्ये पैसे टाकण्यासाठी एका कंपनीच्या एजन्सीची गाडी आल्यानंतर ही घटना घडली. गोळी भिंतीला छेदून खाली उभ्या असलेल्या दहा फूट अंतरावर स्कुटीजवळ जाऊन आदळली. बंदुकीच्या गोळीचा आवाज आल्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. त्यानंतर नागरिकांनी एकच गर्दी केली. कंपनीचे कार्यालय नागपूरला असल्यामुळे अधिकाऱ्यांशी संपर्क साधता आला नाही.

पोलिसांपासून लपवली माहिती : बंदुकीतूनगोळी सुटल्यानंतर पहिल्यांदा पोलिसात माहिती देणे आवश्यक असते. मात्र, या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली नाही. गोळी सुटल्यानंतर संबंधित कंपनीच्या चौघांनीही वाहनासह पोबारा केला. रामदासपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नाही. प्रत्यक्षदर्शीम्हणतात, दोन गोळ्या सुटल्या : गोळीचाआवाज आल्याने आजूबाजूचे नागरिक भयभीत झाले. काही वेळानंतर ते घटनास्थळावर पोहोचले असता बंदुकीतून दोन गोळ्या सुटल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.
दोन मिनिटांपूर्वीच तेथून गेले होते दोघे
समोर एटीएम पाठीमागे बँक असल्यामुळे नागरिकांची ये-जा असते. दुपारी वाजता पाऊस सुरू असल्यामुळे वर्दळ नसली तरी गोळी सुटण्याच्या आधी तेथून काही क्षणांपूर्वीच दोघे जण गेले होते. जर त्यांना थाेडाजरी उशीर झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. दोन मिनिटांपूर्वीच तेथून गेले होते दोघे
बातम्या आणखी आहेत...