आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या जणांना पकडले, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेने अकोट ते अकोला रोडवरील एफसीआयच्या गोडावूनजवळून पकडले. त्यांच्याकडून पोलिसांनी लोखंडी पाईप, मिरची पूड, दोरी, चावीचा गुच्छा असे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई सोमवारी संध्याकाळी करण्यात आली. या आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १७ जुलै पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांना दरोड्याबद्दल माहिती मिळाली. त्या आधारे पथकाने अकोला-अकोट रोडवरील एफसीआयच्या गोडावूनजवळ सापळा रचला. दरोड्याचे नियोजन करीत असलेल्या अंकुश अरुण केवतकर (वय २३ रा. जुने शहर), राजेश साहेबराव चव्हाण (वय ३२ रा. जुने शहर), रितेश अंबादास मृर्दुगे (वय ३२ रा. वाशिम बायपास), राकेश दिलीप वाडेकर (वय ३२ रा. जुने शहर), नवीन प्रल्हाद पाली (वय २४ रा. जुने शहर) यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी केली असता दरोडा टाकण्याचा इरादा असल्याची कबुली त्यांनी दिली. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक विजयकांत सागर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेंद्र मोरे, पोहेकॉ. शेर अली, अजय नागरे, संदीप काटकर, संतोष मेंढे, शेख हसन, संदीप टाले यांनी केली.
 
मिरची पूड फेकून लुटले होते लाख 
या आरोपींनी १३ जून २०१५ रोजी सरकारी बगिच्याजवळ एका व्यापाऱ्याला लुटले होते. त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्याच्याकडून सुमारे तीन लाख रुपये घेऊन त्यांनी पळ काढला होता. तेव्हापासून या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या रडारवर होते. अखेर स्थानिक गुन्हे शाखेला आरोपीला पकडण्यात यश आले आहे. त्या गुन्ह्याची कबुली आरोपींनी दिली आहे. 
बातम्या आणखी आहेत...