आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच लाखांची घरफोडी, चोरटे हिंगोलीकडील असल्याचा अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - घरफोडून चोरट्यांनी चार लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीनंतर गोरक्षण रोडवरील सहकारनगरात घडली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल केले असून, पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
सहकारनगरातील स्टेट बँक कॉलनीतील ५१ वर्षीय शरद केशवराव कोकाटे यांनी त्यांच्या इलेक्ट्राॅनिक्सच्या दुकानातून आणलेली रक्कम घरातच ठेवली होती. मंगळवारी रात्री कोकाटे हे त्यांची पत्नी दोन मुलांसह घरातील समोरच्या हॉलमध्ये जेवण आटोपून झोपले. चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास घराच्या मागच्या दाराचा कडीकोंडा तोडला घरात प्रवेश केला. चोरट्यांनी त्यांच्या घरातील व्यवसायातून आलेले तीन लाख २० हजार रुपये, पत्नीच्या ब्युटीपार्लर व्यवसायातून कमावलेले २५ हजार रुपये मुलांचे पॉकीटमनी म्हणून बेडरूमध्ये ठेवलेले आठ हजार रुपये, १० नग चांदीचे शिक्के किंमत १० हजार रुपये, सोन्याचे चार शिक्के किंमत २१ हजार रुपये, चायना मोबाइल किंमत २६ हजार रुपये अॅक्टिव्हा स्कूटर किंमत ५५ हजार रुपये असा चार लाख ६५ हजार रुपयांचा एेवज चोरून नेला. सकाळी कोकाटेंना साडीने दाराचा कडीकोंंडा बांधलेला दिसला. त्यांनी दार जोरात ढकलले असता घरातील कपाटातील सामान अस्ताव्यस्त दिसून आले. त्यानंतर घरात चोरी झाल्याचे समजले. त्यांनी खदान पोलिस ठाणे गाठून चोरीची माहिती दिली. ठाणेदार सी. टी. इंगळे हे त्यांच्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून काही संशयितांना ताब्यात घेतले होतेे. घटनास्थळाला शहर पोलिस उपअधीक्षक प्रदीप चव्हाण यांनी भेट देऊन तपासाचे आदेश दिले.

कूलरमुळे हॉलमध्ये झोपले:
हॉलमध्येकूलर असल्यामुळे सर्व जण हॉलमध्ये झोपले होते. बेडरूममध्ये कुणीही झोपलेले नव्हते. हीच संधी साधत चोरट्यांनी घरात प्रवेश केला.

शहरातील अलीकडील सर्वात मोठी घरफोडी
अनेकदिवसातील सर्वात मोठी घरफोडी असून, चोरटे हिंगोलीकडील असल्याचा पोलिसांचा संशय आहे. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.