आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवासस्थानांसाठीचे पाच कोटी गेले परत, पोलिसांच्या निवासस्थानांची दुरवस्था

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पोलिसांच्या निवासस्थानांची दुरवस्था झाल्यामुळे त्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या कालावधीत काम सुरू केल्यामुळे ती रक्कम परत गेली आहे. त्यामुळे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील आणि जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांच्या पाठपुराव्यावर पाणी फिरले आहे.

शहरातील पोलिस निवासस्थाने ही राहण्याजोगी राहिली नाहीत. त्यामुळे पोलिस अधीक्षकांनी निवासस्थानांच्या दुरुस्तीसाठी शासनस्तरावर प्रयत्न केले. त्याची दखल घेत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पाच कोटी रुपयांची तरतूद करून दिली. त्यानंतर कुठल्या निवासस्थानावर खर्च करायचा, त्याचा आराखडाही तयार करण्यात आला होता. ही रक्कम अमरावती येथील मुख्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्द करण्यात आली होती. मात्र, त्यासाठी निविदा काढण्यास विलंब झाल्यामुळे पोलिसांच्या निवासस्थानांचे दुरुस्तीकरण रखडले आहे.

गृहराज्यमंत्र्यांच्याकारवाईकडे लक्ष
गृहराज्यमंत्रीडॉ. रणजित पाटील यांनी विशेष बाब म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांच्या पाठपुराव्यामुळे पोलिसांच्या दक्षतानगर आणि देवी खदान येथील निवासस्थानांच्या नूतनीकरणासाठी पुढाकार घेतला होता.

त्यासाठी त्यांनी निधीचीही तरतूद केली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे तो निधी परत गेल्यामुळे गृहराज्यमंत्र्यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवल्याचा प्रकार झाला आहे. त्यामुळे आता हा निधी पुन्हा खेचून आणतात की, दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागून आहे. या सर्व प्रकारामध्ये मात्र, पोलिसांच्या निवासस्थानांची दुरवस्था कायमच अाहे.

अतिरिक्त बजेटमध्ये निधी
२०१४-१५च्या आर्थिक वर्षासाठी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी डिसेंबर २०१४ च्या अतिरिक्त बजेटमध्ये पोलिस वसाहतीच्या दुरुस्तीसाठी कोटी रुपये मंजूर केले होते. तो निधी ३१ मार्चपर्यंत खर्च करणे अपेक्षित होते. त्यानुसार कोटी ३४ लाख ७८ हजार रुपये उपलब्ध झाले होते. मात्र, ही रक्कम उपलब्ध होऊनही निविदा प्रक्रिया निघाल्यामुळे ही रक्कम परत गेली आहे.
बातम्या आणखी आहेत...