आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघाताच्या घटनेमध्ये 5 जण मृत्यूमुखी, काळी पिवळीच्या धडकेत दुचाकीवरील पिता-पुत्र ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदुरा येथे घटनास्थळी नागरिकांनी केलेली गर्दी. - Divya Marathi
नांदुरा येथे घटनास्थळी नागरिकांनी केलेली गर्दी.
काळी पिवळीच्या धडकेत दुचाकीवरील पिता-पुत्र ठार
नांदुरा  - भरधाव जाणाऱ्या काळी पिवळीने समोरून येत असलेल्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात शेलगाव मुकूंद येथील पिता पुत्र जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी रात्री १० वाजता मलकापूर खामगाव राष्ट्रीय मार्गावरील वडी शिवारात घडली.
 
शेलगाव मुकूंद येथील रहिवासी श्रीराम निनाजी वानखेडे हे मुलगा मोहन वानखेडे याच्यासोबत शुक्रवारी रात्री एमएच २८/ २९८९ या क्रमांकाच्या दुचाकीने आपल्या गावाकडे जात होते. वडी शिवारात येताच त्यांच्या दुचाकीला समोरून भरधाव येणाऱ्या एमएच ३० ९५६८ या क्रमांकाच्या काळी पिवळीने धडक दिली. डोक्याला मार लागल्याने पिता पुत्राचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष विकास निंबोळकर रुग्णवाहिकेसह घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यास मदत केली. 
 
पाण्याचा टँकर उलटल्याने झाल्याने चालकाचा मृत्यू 
नांदुरा - पाण्याचे टँकर पलटी झाल्याने टँकरखाली सापडून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता महाळुंगी शिवारात घडली. 
 
तालुक्यातील वाडी येथे पाणीटंचाई असल्यामुळे या गावाला महाळुंगी येथून टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान आज गावातील विजय पुंजाजी खोडके हे एमएच २८ एजे ०२२९ या क्रमांकाचे पाण्याचे टँकर घेऊन गावाकडे येत होते. परंतु रस्त्यातच टँकरचे मागील चाक मातीत फसले. या वेळी पाण्याने भरलेले टँकर पलटी होऊ नये, या भीतीने त्यांनी ट्रॅक्टरची गती वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र टँकर रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाले. या अपघातात विजय खोडके हे टँकरखाली दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. या प्रकरणी पोलिसांनी टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पीएसआय इंगळे करत आहे. 
 
कार-दुचाकीच्या अपघातात शिक्षक ठार 
मलकापूर - खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात इंडिकाने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात शिक्षकाचा मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना मलकापूर ते बोदवड मार्गावरील टॉवर जवळ शुक्रवारी रात्री घडली.
 
शेलापूर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले पंडित सोनू वाघ वय ५५ हे शहरातील गोकुलधाम परिसरात वास्तव्याला होते. ते मूळचे जामनेर तालुक्यातील राजनी येथील रहिवासी होते. पंडित वाघ हे पत्नी माया यांना सोबत घेऊन राजनी येथे आपल्या मूळगावी गेले होते. ११ आॅगस्ट रोजी दोघेही एमएच २८ एल ५५६ या क्रमांकाच्या दुचाकीनेे मलकापूरकडे येताना बोदवड मार्गावरील टॉवर जवळ त्यांच्या दुचाकीला एमएच १७ एजे ५५१९ या क्रमांकाच्या इंडिका कारने धडक दिली. या अपघातात शिक्षक पंडित वाघ यांचा जागीच मृत्यू झाला. 
बातम्या आणखी आहेत...