आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच दरोडेखोर विशेष पथकाच्या सापळ्यात, वाशीम नगराध्यक्ष खून प्रकरणातील आरोपीचा सामावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- वाशीम जिल्ह्यातील पाच कुख्यात दरोडेखोरांना पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने रविवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास बार्शीटाकळी रोडवर पकडले. सोने तस्करीच्या बहाण्याने पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात ते अडकले. पोलिसांनी त्यांच्याकडून नेपाळच्या चलनी नोटा जप्त केल्या आहेत. 

पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना गोपनीय माहिती मिळाली की, वाशीम येथील कुख्यात आरोपी अकोल्यात दरोड्याच्या प्रयत्नात आहेत. अळसपुरे यांच्या चमुने दरोडेखोरांशी पंटरद्वारे संपर्क साधून खडकी येथील राधिका हॉटेलच्या बाजूलाच सापळा रचला. यावेळी त्यांनी पाच अट्टल दरोडेखोरांना अटक केली. अटक केलेल्या पाचही आरोपींवर वाशीम जिल्ह्यातील न्यायालयात गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

आरोपी वाशीमचे नगराध्यक्ष बेनीवाले खून प्रकरणातील
विठ्ठल दिलीप दळवी (वय २५, महात्मा फुले चौक वाशीम) हा नगराध्यक्ष गंगु बेनीवाले यांच्या खुनातील आरोपी आहे. तसेच त्याच्यावर भांदवि ३५३, ३़०७,३९२, ४२५, आर्म अॅक्टनुसार गुन्हे दाखल आहेत. तर दीपक रजन बनसोड (वय २७ रा. काटा ज़ि. वाशीम), संतोष विठ्ठल काळे (वय २२ रा. वाशीम), दगडु शिवराम गायकवाड (५५रा. रिसोड), शिवाजी गणपत भुटेकर (वय ३२, रा. देगाव ता. रिसोड) यांच्यावर लुटमार आणि दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. तीन दिवसांपूर्वी यातील आरोपींवर वाशीममध्ये दरोड्याचे गुन्हे दाखल असून पोलिस त्यांचा तपास करीत आहेत. 

असे अडकले सापळ्यात 
आमच्याकडे अडीच-तीन किलो सोने आहे. कमी भावात ते विकायचे आहे. असे म्हणून आरोपी बड्या व्यापाऱ्यांना गळाला लावतात. त्यानंतर ते सोने समजून पिवळे धातू देतात त्यांच्याकडील रक्कम घेऊन पळून जातात. सोने तस्करीच्या बहाण्याने सहायक पोलिस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांनी सापळा रचला आणि बार्शीटाकळी रोडवरील राधिका हॉटेलच्या बाजूला आरोपींना बोलावले. तेथे शिकार करण्यासाठी आलेली दरोडेखोरांची टोळी विशेष पथकाची शिकार झाली. 
बातम्या आणखी आहेत...