आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच रात्री पाच चोऱ्या,आठवड्यातील दुसरी घटना, पोलिसांचेहोतेय दुर्लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर- एकाचरात्री शहरातील तीन ज्वेलर्स, एक कृषी सेवा केंद्र एक किराणा दुकान फोडल्याची घटना २१ जूनच्या मध्यरात्री घडल्यानंतर २२ जूनला सकाळी शहरात खडबळ उडाली असून, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दोन दुकाने वगळता चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. शहरात वाढत्या चोऱ्या पोलिसांसमोर आव्हान ठरले आहे.

१८ जूनला एकाच रात्री तीन दुकाने फोडली होती. यामध्ये एक ज्वेलर्स दुकान तर दाेन घरगुती चोऱ्या झाल्या होत्या. मात्र, यामध्ये चोरट्यांच्या हाती काहीही लागले नव्हते. मात्र, चोरट्यांनी पोलिसांच्या दबावाला जुमानता चाेरीचा प्रयत्न कायम ठेवून २१ जूनच्या मध्यरात्री शहरातील तब्बल पाच दुकाने फोडली. दोन दुकाने वगळता चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. शहरातील जयस्तंभ चौकात भाजपचे शहराध्यक्ष भारत भगत यांचे भारत ज्वेलर्स दुकान आहे, तर बाजूलाच माँ शारदा प्रोव्हीजन तसेच समाेरच्या चाळीत सूरज ज्वेलर्स आहे. ही सर्व दुकाने आजूबाजूला असून, एकाच रात्री अज्ञात चोरट्यांकडून फोडण्यात आली. यामध्ये माँ शारदा प्रोव्हीजनचे टॉमीने शटर वाकवून आत प्रवेश केला. दुकानातील आठ हजार रुपये लंपास केले. सदर दुकानाचा गल्ला परिसरातील एका बोळीत आढळून आला, तर भारत ज्वेलर्सचे शटर वाकवण्याइतपत यश त्यांना मिळाले नाही, तर सूरज ज्वेलर्सचे कुलूप तसेच शटर मोठ्या कारागिरी पद्धतीने तोडण्यात आले. मात्र, दोन्ही ज्वेलर्स दुकानातून कोणतेही साहित्य लंपास झाले नाही. जुनी वस्ती परिसरातील मुख्य मार्गावरील दोन दुकाने फोडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. पोलिस स्टेशनच्या भिंतीला लागूनच असलेल्या मुख्य मार्गावरील धनलक्ष्मी सेवा केंद्राचे शटर वाकवून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शटरला लागून लाकडी टेबल असल्याने चोरट्यांना आत प्रवेश करता आला नाही तसेच या भागातील वाळेकर ज्वेलर्स दगडाच्या साहाय्याने कुलूप तोडण्यात आले. त्यामधील चांदी लंपास केल्याचे वृृत्त आहे. सर्व ठिकाणी पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपासाला वेग दिला आहे. मात्र, सततच्या घटनेने पोलिसांचा वचक नसल्याचे सिद्ध होत आहे.

लघूव्यावसायिक वेठीस : पोलिसांनाअधिकार नसताना शहरातील लघू व्यावसायिकांना १० वाजता दुकाने बंद करण्यासाठी पोलिसांची गाडी फिरते. लघू व्यावसायिकांना वेठीस धरून दुकाने बंद केली जातात. दरम्यान, शिवीगाळ करून असभ्य वागणूक देण्यात येते.
ठाण्याजवळच्या दुकानाचे शटर वाकवले.

यापुढे दक्षता घेण्यात येईल
चोऱ्यांचाप्रकार पाहून आम्ही गंभीर आहोत. त्यादृष्टीने तपास जलदगतीने सुरू आहे. त्यानंतर चाेरीच्या घटना घडणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येईल.'' गजानन पडघन, ठाणेदार
बातम्या आणखी आहेत...