आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली, एकाला केले रुग्णालयामध्ये भरती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - वसतीगृहात प्रवेश मिळत नसल्याने उपाेषणाला बसलेल्या पाच अादिवासी विद्यार्थ्यांची प्रकृती बुधवारी बिघडली. एका विद्यार्थ्याला तर रुग्णालयात भरतीही करण्यात अाले. विद्यार्थींनींनी साेमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर उपाेषण केले हाेते.
२०१६-१७ या शैक्षणिक सत्रासाठी एकात्मिक अादीवासी विकास प्रकल्प क्षेत्रातील वसतीगृहांमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज केले हाेते. वसतीगृहासाठी अर्ज करुनच विद्यार्थ्यांनी महािवद्यालयात प्रवेश घेतला. प्रवेश घेणाऱ्यांमध्ये अकाेला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश अाहे. मात्र वसतीगृहात प्रवेश मिळाल्याने शिक्षण अर्धवट साेडण्याची वेळ विद्यार्थ्यांवर अाली अाहे, असे जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात अाले हाेते.

यापूर्वीही घेतली हाेती कार्यालयात धाव : वसतीगृहात प्रवेश देण्यासह इतरही मागण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकात्मिक अािदवासी विकास प्रकल्प कार्यालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली हाेती. तसेच २० सप्टेंबर राेजी विद्यार्थ्यांनी कार्यालय परिसरातच ठिय्या दिला हाेता. वसतीगृहात प्रवेश मिळत नसल्याने शैक्षणिक नुकसान हाेत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे हाेते. यावर प्रकल्प अधिकाऱ्यांनी मान्यता प्राप्त झाल्यास प्रवेश क्षमता वाढवून देण्याचे अाश्वासन दिले. विद्यार्थ्यांनी वसतीगृहात प्रवेश देण्यासह वसतीगृहातील समस्या अधिकाऱ्यांना सांगितल्या. अधिकाऱ्यांनी समस्याही साेडण्याची ग्वाही दिली हाेती. मात्र हा या मागण्या पूर्ण झाल्या नसल्याने विद्यार्थ्यांवर शिक्षण बाजूला ठेवून अांदाेलन करण्याची वेळ अाली.

अकाेला क्षेत्रातील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग : एकात्मीक अादीवासी प्रकल्प कार्यलया अंतर्गत अादीवासी मुलांचे शासकीय वसतीगृह (नवीन जुने, अकाेला), अादीवासी मुलांचे शासकीय वसतीगृह (जुने नवीन वाशिम),अादीवासी मुलांचे शासकीय वसतीगृह (मूर्तिजापूर), अादीवासी मुलांचे शासकीय वसतीगृह (मंगरूळपीर), अादीवासी मुलांचे शासकीय वसतीगृह (तेल्हारा), अादीवासी मुलांचे शासकीय वसतीगृह (खामगाव), अादीवासी मुलांचे शासकीय वसतीगृह (संग्रामपूर), अादीवासी मुलांचे शासकीय वसतीगृह (बुलडाणा), अािण अादीवासी मुलींचे शासकीय वसतीगृह असून, या उपाेषणात विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाल्या हाेत्या.
...तरराष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस अांदाेलन करणार: संग्राम काेते अादीवासीिवद्यार्थी-विद्यार्थिंनींच्या अांदाेनलाची मािहती मिळताच राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम काेते पाटील यांनी बुधवारी प्रकल्प अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरुन संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या समास्या तातडीने साेडवण्याची मागणी केली. अधिकाऱ्यांनीही प्रशासन मागण्यांबाबत सकारात्मक असून, तात्काळ मागण्या पूर्ण हाेतील, असे अाश्वासन दिले. विद्यार्थ्यांच्या मागण्या सुटण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, या समस्या सुटल्यास परिणामकारक अांदाेलन करण्यात येईल, असा इशारा काेते पाटील यांनी दैनिक दिव्य मराठी’शी बाेलताना दिला. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या समस्यांबाबत अकाेल्यात निर्णायक अांदाेलन छेडण्यात येईल, असा इशारा काेते पाटील यापूर्वी १८ सप्टेंबर राेजी अकाेल्यात एका पत्रकार परिषदेत दिला हाेता. अादीवासी विद्यार्थ्यांच्या अांदाेलनाच्यानिमित्ताने त्यांनी समस्यांकडे लक्ष देण्यास सुरुवात केल्याचे दिसून अाले.

राजकीय पक्षांचा पुढाकार
अादिवासी विद्यार्थी-विद्यार्थीनींशी बुधवारी भाजप अामदार हरिष पिंपळे, कॉंग्रेसचे अामदार अमित झनक, भारिप-बमसंच्या जिल्हा परिषद सदस्या तथा महिला अाघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रतिभा अवचार यांनी चर्चा केली.

यांची खालावली प्रकृती :
साेमवारीसुरु केलेल्या उपाेषणामुळे बुधवारी पाच विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली. यामध्ये शिवशंकर राजाराम मिराजे, देवीसास साेखे, रामदास वसंत धंदरे, सिद्धेश्वर साेळंखे, उमेश मरसकाेल्हे यांचा समावेश हाेता. विठ्ठल गजानन लाेखंडे या उपाेषणकर्त्याची प्रकृती बिघडल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात अाले.

सर्व समस्या सुटतील
विद्यार्थी-विद्यार्थिनींशी मंगळवारीअतििरक्त अायुक्त मी स्वत: चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या सर्वच समस्या सुटण्यासाठी, मागण्या मंजूर करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत अाहे. लवकरच समस्या सुटतील. - विनिता साेनवणे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक अादीवासी विकास प्रकल्प कार्यालय, अकाेला.

या अाहेत मागण्या
>अकाेल्यात १००० क्षमता असलेले वसतीगृह, बुलढाणा अािण वाशिम येथे प्रत्येकी ५०० विद्यार्थी क्षमतेचे वसतीगृह बांधण्यात यावे.
>वसतीगृहांची संख्या क्षमता वाढवण्यात यावी.
>तेल्हारा मंगरूळपीर येथील वसतीगृहांच्या इमारती बदलण्यात याव्यात.
>एकात्मिक अादीवासी विकास विकास प्रकल्प अधिकारी विनिता साेनवणे यांची बदली करण्यात यावी.

मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही, उपाेषण सुटले
अादिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी बुधवारी रात्री उपाेषण साेडले. अधिकाऱ्यांनी १५ दिवसात मागण्या मंजूर करण्याचे अाश्वासन दिल्याने उपाेषण मागे घेण्यात अाले. याप्रसंगी प्रकल्प अधिकारी विनिता साेनवणे, माजी अामदार हरिदास भदे, भािरप-बमंस महिला अाघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रतिभा अवचार, प्राचार्य प्रकाश खुळे यांच्यासह अादीवासी विद्यार्थी कृती समितीचे सदस्य उपस्थित हाेते. १५ दिवसात मागण्या मंजूर झाल्यास विद्यार्थ्यांसाेबत भाजपचे अामदार हरिष पिंपळे हे नाशिक येथे अांदाेलन करणार अाहेत.
बातम्या आणखी आहेत...