आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातासांठी कारणीभूत ठरताहेत ‘फ्लॅश लाइट’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - चारचाकी तसेच दुचाकी वाहनांना फ्लॅश लाइट, सेन्सर लाइट सर्रास लावल्या जात आहेत. रात्रीच्या वेळेस हे लाइट थेट समोरच्या वाहनचालकांच्या डोळ्यांवर येत असल्यामुळे समोरच्या वाहनाचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहनावर आदळून अपघाताच्या घटना घडताहेत. या अवैध लाइट विक्रीवर आणि अशा वाहनांवर आरटीओ पोलिस विभागाचा अंकुश नसल्यामुळे दररोज निरपराध वाहनचालकांना आपला जीव गमवावा लागत आहे.

रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, शहरात अनेक चौकांत नसलेली सिग्नल यंत्रणा आदी कारणांमुळे वाहनांच्या अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे, तर दुसरीकडे सध्या दुचाकी, चारचाकी वाहनांना विविध प्रकारचे लाल, निळे, व्हाइट, असे विविध रंगांचे सेन्सर लाइट बसवण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. तीव्र प्रकाश असणारे हे लाइट अन्य वाहनधारकांच्या डोळ्यांमध्ये चमकत असल्याने वाहन चालवण्यास अडचणी येतात. या प्रकारामुळे आता छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सर्वाधिक अपघात रात्रीच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी, ऑटो आणि ट्रकमध्ये होत आहेत. मात्र, या सर्व पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन आरटीओ अशा प्रकारच्या एलइडी लाइट्स बसवणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करताना दिसून येत नाहीत. वाहनांना बसवण्यात येणाऱ्या चमकदार विद्युत दिव्यांमुळे अन्य वाहनधारकांना त्याचा प्रचंड त्रास होतो. विशेषत: चष्मा वा हेल्मेट घातलेल्या वाहनधारकांवर लाइटचा प्रकाश रिफ्लेक्ट होत असल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. अनेकांना या दिव्यांमुळे डोळ्यांसमोर अंधाऱ्या येतात आणि अपघात घडतो, अशी वाहने आणि लाइट विक्री करणाऱ्यांवर कारवाई झाल्यास अपघातांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

अपघातांमध्ये होतेय वाढ
रस्त्यांचीदुरवस्था, वाहतूक कोंडी, शहरात अनेक चौकांत नसलेली सिग्नल यंत्रणा आदी कारणांमुळे वाहनांच्या अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सर्वाधिक अपघात रात्रीच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी, ऑटो आणि ट्रकमध्ये होत आहेत. दुचाकी, चारचाकी वाहनांना विविध प्रकारचे लाल, निळे, व्हाइट, असे विविध रंगांचे सेन्सर लाइट बसवण्याचे प्रकार वाढू लागले आहेत.

१५० ते ४०० रुपयांपर्यंत सहज उपलब्ध : शहरातीलस्पेअर पार्टसच्या दुकानांमध्ये विविध रंगांचे दुचाकीचे सेन्सर लाइट प्रकारानुसार १५० ते ४०० रुपयांपर्यंत सहजरीत्या उपलब्ध होतात. विशेष म्हणजे, अशा प्रकारच्या लाइट बसवण्याकडे महाविद्यालयीन तरुणांचा अधिक भर असतो. फ्लॅश लाइट सेन्सर लाइट वाहनाला लावण्यास कायद्याने बंदी असताना त्याचा सर्रास वापर होताना दिसून येत आहे.

काय म्हणतो कायदा? : कंपनीनेवाहनांना जे दिवे दिले आहेत, त्याव्यतिरिक्त अन्यत्र दिवे लावू शकत नाही. तसे लावायचेच असतील, तर आरटीओची रीतसर परवानगी घेणे गरजेचे असते. वाहननिर्मिती कंपन्यांनी आरटीओच्या नियमाप्रमाणे वाहनांना विद्युत दिव्यांची योजना केलेली असते. त्या व्यतिरिक्त कोणी अतिरिक्त लाइटस लावले, तर संबंधित वाहनचालक कारवाईस पात्र ठरतो, अशा वाहनांवर आरटीओ आणि पोलिसांना कारवाई करण्याचे अधिकार आहेत.

विक्रेत्यांवर कारवाई का नाही? : फ्लॅशलाइट सेन्सर लाइट वाहनाला लावण्यास कायद्याने मनाई आहे. प्रत्यक्षात लाइटची विक्री होत आहे. वाहनचालकांसह अशा दुकानदारांवर कारवाई का केली जात नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. नियमबाह्य वस्तू उत्पादित करणाऱ्या कंपन्यांवरच कारवाई झाली अथवा त्यांना आवश्यक ती बंधने घालून देण्यात आली, तर वाहनचालकांना या नियमबाह्य वस्तू विकत घेताच येणार नाहीत. नियमांचेही उल्लंघनही होणार नाही.

नियमांकडे होतेय दुर्लक्ष
आरटीओच्या नियमाप्रमाणे वाहनांच्या कंपनीने बसवलेल्या प्रकाश दिव्यांपेक्षा अन्य प्रकाश दिवे वाहनधारक लावू शकत नाहीत, असा नियम असताना दुसरीकडे सध्या दुचाकी, चारचाकी वाहनधारक सर्रासपणे सेंसर लाइट, फ्लॅश लाइट लावतात. अशाप्रकारे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. याकडे आरटीओ विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.