आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"विमानतळा'साठी केली जागेची पाहणी, पीकेव्हीकडून घेणार जागा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- विमानतळ विस्तारीकरणासाठी अाता जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. २४ सप्टेंबर राेजी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे तहसीलदार संतोष शिंदे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात भेट दिली. या वेळी महसूल अधिकाऱ्यांनी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या जागेची पाहणी करून कुलसचिव कडू यांच्याशी चर्चा केली.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ प्रशासनाने दिशाभूल करणारी माहिती एअरलाइन्स रेग्युरॅलिटी समितीला दिल्याने बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या. हा गैरसमज तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी लक्ष घालून केंद्रीय उड्डाणमंत्र्यांना विमानतळ विस्तारीकरणाची गरज त्यातील अडचणी कशा दूर केल्या जातील याविषयी चर्चा केली.
अमरावतीपेक्षाही जुनी धावपट्टी असल्याने अकोल्यातील विमानतळ तीन जिल्ह्यांच्या विकासाशी निगडित असल्याने त्याची गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा हा प्रश्न तातडीने सोडवण्याचे आदेश प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी महसूल अधिकाऱ्यांना तातडीने विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी जागा तपासणीचे आदेश दिले होते.
पीकेव्हीच्याजागेची पाहणी : विमानतळिवस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या गुडधी शिवर भागातील ६० हेक्टर जागेची पाहणी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, जिल्हा भूसंपादन अधिकारी एम. डी. शेगावकर, तहसीलदार संतोष शिंदे यांनी कृषी विद्यापीठात दुपारी भेट दिली. या वेळी त्यांनी जागेची पाहणी केल्यानंतर कुलसचिव कडू यांच्याशी चर्चा केली. जागा ताब्यात घेऊन महसूल विभागाच्या नावावर केली जाणार आहे.

तांत्रिक अडचणी दूर
विमानतळाच्याविस्तारी - करणासाठी आडकाठी बनलेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. कृषी विद्यापीठ महसूल प्रशासनाने आपसात समन्वय साधून जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही केली जाईल. त्यानंतर विस्तारीकरणाच्या कामास प्रारंभ होईल. अकोला जिल्हा प्रशासनाला अानुषंगिक सूचना दिल्या आहेत. डॉ.रणजित पाटील, पालकमंत्री.