आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : आज अकोला \'है पानी पानी\'; जनजीवन विस्‍कळीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पावसामुळे अकोला शहरालगत असलेल्‍या गावांचा संपर्क तुटला आहे. - Divya Marathi
पावसामुळे अकोला शहरालगत असलेल्‍या गावांचा संपर्क तुटला आहे.
सर्व छाया - नीरज भांगे, अकोला.
अकोला - जिल्‍ह्यात तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्‍याने नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. अकोला जिल्ह्यातील उमा, निर्गुणा, काटेपूर्णा धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने नद्यांना पूर आला असून, त्यात बाळापूर, अकोट व तेल्हारा तालुक्यांतील तिघे बेपत्ता झाले आहेत. दरम्‍यान, अकोला शहरातून वाहना-या मोर्णा नदीने आपले पात्र सोडले आहे. त्‍यामुळे जुने शहर भागातील अनेक घरांमध्‍ये पाणी घुसले असून, जनजीवन विस्‍कळीत झाले आहे.
पूर्णेच्‍या पुलावरून 14 फूट पाणी
पुरामुळे अकोला ते अकोट रस्‍त्‍यावर पूर्णा नदीच्या पुलावरून जवळपास १४ फूट पाणी वाहत आहेत. त्यामुळे सलग दुस-या दिवशीही अकोट मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तळेगाव डवला व तळेगाव पातुर्डा, नेर, सांगवी, जुनी उमरी, पिवंदळ, धामणा व अंदुरा अशा आठ गावांचा पुरामुळे संपर्क तुटला आहे. येवता, निमकर्दा व बटवाडीत पावसाने नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुढील ४८ तासांत आणखी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
शाळांना सुटी
अकोला जिल्‍ह्यासारखीच परिस्थिती वाशीम जिल्‍ह्यामध्‍ये झाली आहे. त्‍यामुळे दोन्‍ही जिल्‍ह्यातील शाळांना आज (गुरुवारी) अघोषित सुटी मिळाली आहे. शाळा, कॉलेजमध्‍ये एकही विद्यार्थी आला नाही. दरम्‍यान, रस्‍तेही निर्मुष्‍य झाले आहेत.
संबंधित फोटो पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइड्वर क्लिक करा...