आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : विदर्भात मुसळधार; अकोल्‍यात पूर्णेला पूर, अमरावतीत वृद्ध वाहून गेला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्‍हीडिओ पाहण्‍यासाठी फोटोमध्‍ये क्लिक करा - Divya Marathi
व्‍हीडिओ पाहण्‍यासाठी फोटोमध्‍ये क्लिक करा
अकोला - विदर्भात दोन दिवसांपासून सर्वदूर मुसळधार पाऊस होत असून, यामुळे नदी नाल्‍यांना पूर आला आहे. दरम्‍यान, अकोला परिसरातून वाहणाऱ्या पूर्णा नदीला पूर आला आहे. त्‍यामुळे अकोल्‍याकडून अकोटकडे जाणारी वाहतूक ठप्‍प झाली आहे. गांधीग्राम पुलाच्‍या 10 फुटावरून पाणी वाहत आहे. अशीच परिस्थिती वाशीम जिल्‍ह्यातही आहे. दरम्‍यान, अमरावती जिल्‍ह्यातील दर्यापूर येथे एक वृद्ध पुरात वाहून गेल्‍याचे वृत्‍त आहे.
मंदिराचा कळसही पाण्‍याखाली
अकोट रस्‍त्‍यावर पूर्णातिरी असलेले महादेव मंदिरही पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे. दरम्‍यान, परिसरातील पिकाचे नुकसान झाले आहे.
अकोल्‍यातील रस्‍त्‍यांवरही पाणी
पावसामुळे अकोल्‍यातील रस्‍त्‍यांवरही मोठ्या प्रमाणा पाणी साचले आहे. त्‍यामुळे बहुतांश नागरिकांनी घराबाहेर जाणे टाळले आहे तर अनेक विद्यार्थ्‍यांनी शाळांनाही दांडी मारली.
जुने शहरातील अनेक घरांत पाणी
अकोला शहरामध्‍ये नदी काठाच्‍या जवळ असलेल्‍या अनेक घरांमध्‍ये पुराचे पाणी शिरले आहे. त्‍यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे.
तीन वर्षांपासून निधी पडून
दरवर्षी पावसाळ्यात पुरामुळे अकोला ते अकोट हा रस्‍ता बंद होतो. त्‍यामुळे गांधीग्राम पुलाची उंची वाढवण्‍याचा प्रस्‍ताव मंजूर झाला आहे. मात्र, तीन वर्षांपूर्वीच निधी येऊनसुद्धा उंची वाढवली गेली होती. परिणामी, या रस्‍त्‍यावरील वाहतूक ठप्‍प होत आहे.

अमरावती जिल्‍ह्यातील वृद्ध बेपत्‍ता

दर्यापूर तालुक्‍यातील उमरी ममदापूरजवळून वाहणार्‍या शहानूर नदीत मनोहर काळे (65) हे वाहून गेल्‍याचे वृत्‍त आहे. त्‍यांचा युद्ध पातळीवर शोध सुरू आहे. काळे हे गावातीलच एका परिचिताच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. नदीजवळून काही अंतरावरच असलेल्या नाल्याच्या काठावरून ते परतत होते. दरम्यान, तोल गेल्यामुळे ते नाल्यात पडले व लगेच नदीच्या मुख्य प्रवाहात वाहून गेले.

शेलूबाजारमध्‍ये विद्युत रोहित्र वाहून गेले
वाशीम जिल्‍ह्यातील शेलूबाजार येथे ओढ्याकाठी असलेले विद्युत रोहित्र पुरात वाहून गेले आहे. परिणामी, वीज पुरवठा खंडित झाला आहे. पुरामुळे काही ओढ्याकाठी असलेल्‍या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटो....