आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उड्डाणपूल, 2 रस्त्यांची घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - न्यू तापडियानगरमध्ये जाण्यासाठी नवीन उड्डाणपूल शहरात दोन नवीन रस्ते दिवाळीची अग्रिम भेट म्हणून देत आहोत, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. ते शनिवारी अशोक वाटिका चौक ते रेल्वेस्थानकापर्यंतच्या उड्डाणपुलाच्या आणि राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी करण्याच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी अकोल्यात आले असता जाहीर सभेत ते बोलत होते.

शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर अप्पू चौकात नितीन गडकरी यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले होते. याच कार्यक्रमात त्यांनी अशोक वाटिका ते रेल्वेस्थानकापर्यंतच्या उड्डालपुलाचे भूमिपूजन, अमरावती ते चिखली या महामार्गाचे चौपदीकरण, अकोला-वाशीम-हिगोंली-नांदेड २०० किलोमीटरचा रस्ता, अकोला शहरातील डाबकी गावाजवळील उड्डाणपुलाचे प्रतीकात्मक भूमिपूजन केले. या वेळी बोलताना त्यांनी अकोलेकरांना आनंदित केले.
अकोल्याच्या लोकप्रतिनिधींच्या मागणीवर तत्काळ विचार करून त्यांनी न्यू तापडियानगर येथे जाण्यासाठी नागरिकांसाठी नवीन उड्डाणपुलाची घोषणा केली. तसेच शिवर-डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ-नेहरू पार्क- दक्षता चौक-लक्झरी बसस्थानक-वाशीम बायपास ते बाळापूर नाका रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि मुख्य बसस्थानक-सिटी कोतवाली चौक जयहिंद चौक-किल्ला-वाशीम बायपास-पोळा चौक ते बाळापूर नाका रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याची घोषणासुद्धा गडकरी यांनी केली. सुरुवातीला शिवरचे सरपंच यांनी नितीन गडकरी यांचे स्वागत केले. सभेला पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे, खासदार अजय संचेती, खासदार संजय धोत्रे, खासदार आनंदराव अडसूळ, महापौर उज्ज्वला देशमुख, आमदार भाऊसाहेब फुंडकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार प्रकाश भारसाकळे, अमरावतीचे आमदार सुनील देशमुख, नगरसेवक हरीश आलिमचंदाणी, नगरसेवक विजय अग्रवाल, कमल आलिमचंदाणी, नगरसेवक गोपी ठाकरे यांच्यासह भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

खासदारांची हात जोडून विनंती
सोयाबीनवरछापे पडले म्हणून शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे भाव कमी झाले. विषय जरी राज्य सरकारचा असला तरी तुम्ही काहीही करू शकता. आमचे पंतप्रधानही तुम्हीच आहात. आतापर्यंत आमच्यावर अन्यायच झाला, तो तुम्ही दूर करावा, अशी हात जोडून विनंती करतो, असे खासदार संजय धोत्रे आपल्या भाषणात गडकरींना उद्देशून म्हणाले. आमदार गोवर्धन शर्मा म्हणाले की, आजपर्यंत मला कुणीच काही दिले नाही. मात्र, तुम्ही पाच हजार कोटी रुपयांचा निधी दिला, तर गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आपल्या भाषणात गडकरींचा "मोठी माय' असा उल्लेख केला.

शेतकऱ्यांनी नर्सरी सुरू कराव्यात : रस्त्याच्याचौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या कडेला झाडे लावावी लागणार आहेत. त्यासाठी झाडांच्या रोपांची गरज भासणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी नर्सरीच्या व्यवसायाकडे वळावे, असे गडकरी म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...