आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदी असतानाही चाऱ्याची जिल्ह्याबाहेर सर्रास होतेय वाहतूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगावमंजू- यंदापर्जन्यवृष्टी अल्पप्रमाणात झाली अाहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक करण्यास निर्बंध घालण्याच्या सूचना दिल्या. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. परजिल्ह्यासोबतच परराज्यातूनही जनावरे बोरगावमंजू परिसरात येत असल्याने या भागातील हजारो जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात सापडला असताना, जनावरांच्या चाराटंचाईमुळे त्यांच्या समस्येत भर पडली आहे. बोरगावमंजू परिसरातील वाशिंबा, निपाणा, वणी रंभापूर या गावांमध्ये २०१२ च्या पशुगणनेनुसार गाय, म्हैस, वळू, शेळ्या, गर्दभ आदी मिळून जवळपास सात हजार जनावरे आहेत. या संख्येत सद्य:स्थितीच वाढ झाली असून, त्यांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. चाराटंचाईची लक्षणे असताना काही जण चाऱ्याची जिल्ह्याबाहेर नेऊन विक्री करत आहेत. त्यामुळे चाऱ्याची जिल्ह्याबाहेर होणाऱ्या वाहतुकीवर निर्बंध आणण्यासाठी शासनाने ठोस कारवाई करण्याची गरज असल्याचे मत पशुपालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

^परप्रांतातील जनावरेजिल्ह्यात दाखल झाली असतील. चाऱ्याची जिल्ह्याबाहेर वाहतूक होत असल्यास कळवावे, त्यांच्यावर कारवाई करू. प्रा. संजय खडसे, एसडीओ.

माहिती द्यावी, कारवाई करू
परप्रांतातील जनावरांना गावबंदीचा ठराव घेणार
^परराज्यातीलजनावरेचारण्यासाठी बोरगावमंजू परिसरात येत असल्यास कुणी चाऱ्याची अन्य ठिकाणी नेऊन विक्री करत असल्यास त्याच्यावर बंदी घालण्यासाठी ठराव घेऊन शासनाकडे पाठवू. साधना भटकर, सरपंच,बोरगावमंजू.

आमची जनावरे कुठे चारायची?
अगोदरचपाऊसकमी झाला. त्यामुळे चाऱ्याची समस्या आहे. परप्रांतासह अन्य जिल्ह्यांतील जनावरे येथे चारण्यासाठी घेऊन येत आहेत. येथील चारा संपल्यावर आम्ही आमची जनावरे कुठे चारायची? देवीदास वानखडे, शेतकरी,बोरगाव.
परजिल्ह्यातील जनावरे चरण्यासाठी बोरगावात आली आहेत.
बातम्या आणखी आहेत...