आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Forget The Orders Of The Court ZP Education Department

झेडपीच्या शिक्षण विभागालाच न्यायालयाच्या आदेशाचा विसर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- विनंतीवरून बदली झालेल्या केंद्रप्रमुखांची आधी बदली करायची आणि नंतर स्वत:च दिलेला आदेश रद्द करायचा, असा प्रकार जिल्हा परिषदेत उघडकीस आला आहे. या प्रकाराने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील घोटाळा उघड झाला आहे. यामुळे शिक्षण विभागाला न्यायालयाच्या आदेशाचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.

अकोट पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पाटसूल येथील शाळेवर कार्यरत किरणकुमार लाटकर यांची विनंतीवरून १४ मे २०१३ रोजी अकोला पं. स. अंतर्गत कानशिवणी येथे बदलीचे आदेश तत्कालीन सीईओंनी दिले हाेते. लाटकर यांनी १९ महिने ११ दिवस कानशिवणी येथे कामही केले असून, त्यांच्याबद्दल तक्रार नसताना १० डिसेंबर २०१५ रोजी तत्कालीन सीईओंनी संजीवनी साळुंके यांना कानशिवणी येथे पदस्थापना दिली. मुळात या पदावर तब्बल १९ महिने कार्यरत असलेल्या लाटकर यांची विनंतीवरून बदली रद्द करून शासन नियमांचे उल्लंघन केले आहे.
संजीवनी साळुंके या कानशिवणी येथे तब्बल जून १९९६ ते ३१ मे २०१५ पर्यंत एकाच ठिकाणी १५ वर्ष ११ महिने २९ दिवस कार्यरत होत्या. त्यांची जिल्हा परिषद सर्वसाधारण बदली प्रक्रिये अंतर्गत २१ जून २०१२ रोजी सीईओंच्या आदेशानुसार कानशिवणी येथून बाळापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या निंबा येथे बदली करण्यात आली होती. मात्र, त्यांनी या बदलीविरोधात विभागीय आयुक्तांकडे तक्रार केल्यावर त्यांची चौकशी करण्यात आली.
या चौकशीअंती विभागीय आयुक्तांनी त्यांची बदली रद्द करण्याचे आदेश दिले होते. मात्र, सर्वसाधारण बदली प्रक्रिये अंतर्गत कानशिवणी येथे समुपदेशन पद्धतीने लाटकर यांना नियुक्ती देण्यात आली असून, त्यांनी १९ महिने तेथे कामही केले आहे. त्यामुळे त्यांची विनंती बदली रद्द करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही.

लाटकर यांनी घेतली होती न्यायालयात धाव
अन्यायाविरोधातलाटकर यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. एकाच पंचायत समितीमध्ये १६ वर्षे झाल्याने संजीवनी साळुंखे यांना दुसऱ्या पंचायत समितीत पदस्थापना देण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाला दिले हाेते. त्यावर अद्यापही कोणतीही कार्यवाही झाली नाही.