अकोला- यापूर्वीयेथे काय झाले, त्याच्या खोलातही मी जाणार नाही, त्यामुळे ते विसरून नव्याने कामाला लागा, नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत मूलभूत सोयीसुविधा मिळाल्याच पाहिजेत, अशी स्पष्ट शब्दात आयुक्त अजय लहाने यांनी विभागप्रमुखांना ताकीद दिली. सप्टेंबरला आयुक्तपदाचा प्रभार स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांनी विभागप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत ते बोलत होते.
आयुक्त अजय लहाने यांनी या बैठकीत प्रथम विभागप्रमुखांची ओळख तसेच त्यांच्याकडे नेमके कोणते काम आहे, याची माहिती घेतली. बैठकीत आयुक्त अजय लहाने म्हणाले, पाणी, रस्ते, स्वच्छता, नाल्यांची सफाई, पथदिवे या मूलभूत सोयी देणे, महापालिकेचे कर्तव्य आहे. नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा कशा उपलब्ध होतील, याकडे प्रत्येक विभागप्रमुखांनी लक्ष केंद्रित करावे. त्यामुळेच मूलभूत सोयीसुविधांसाठी आलेला निधी, वेतनावर कदापिही खर्च करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बिंदू नामावली अद्ययावत नसल्याबद्दल आयुक्त अजय लहाने यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून बिंदू नामावली अद्ययावत करण्याच्या कामाला लागण्याची सूचनाही त्यांनी दिली. कोणत्याही योजनेचा तसेच कामाचा प्रस्ताव हा नियमानुसारच सादर करावा. चुकीचा प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत सादर करू नये, अशी स्पष्ट सूचनाही त्यांनी विभागप्रमुखांना दिली. महापालिका शाळेतील पटसंख्या का कमी झाली? याचा अभ्यास करून महापालिका शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण कसे दिले जाईल, यावरही भर दिला जाईल. या वेळी आयुक्तांनी मंजूर पदे, रिक्त पदे किती? याबाबतही सामान्य प्रशासन विभागाकडून माहिती घेतली.
प्रतिनिधी | अकोला
शहरातीलनागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करण्यास
आपण प्राधान्य देऊ, अशी ग्वाही महापालिकेचे १२ वे आयुक्त अजय लहाने यांनी दिली. नवनियुक्त आयुक्त अजय लहाने यांनी सप्टेंबरला पदभार स्वीकारल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
आयुक्त सोमनाथ शेटे यांची ३१ ऑगस्टला बदली झाली. त्यानंतर आयुक्तपदाचा प्रभार जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडे सोपवण्यात आला होता. दरम्यान, सप्टेंबरला अजय लहाने यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. अजय लहाने यांच्याशी संपर्क साधला असता, ते बुधवारी पदभार स्वीकारणार होते. मात्र, सप्टेंबरलाच त्यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
लहाने म्हणाले, विकासकामांसाठी निधी आहे. विकासकामे होत राहतील. परंतु, सर्वसामान्य नागरिकांना पाणी, रस्ते, पथदिवे, स्वच्छता आदी सुविधा प्राधान्याने देणे गरजेचे आहे. या मूलभूत सुविधा प्रथम उपलब्ध करण्याकडेच आपण गांभीर्याने लक्ष देणार आहोत. त्यातल्या त्यात स्वच्छतेपासून मी प्रारंभ करणार आहे. सफाईसाठी शेकडो कर्मचारी असताना त्यापैकी नेमके किती कार्यरत आहेत? याची माहितीही मी घेणार आहे. यासाठी सप्टेंबरला सायंकाळी स्वच्छता विभागाचाच मी आढावा घेणार आहे, असेही ते म्हणाले.
महापालिकेत कोट्यवधी रुपयांचा निधी आला आहे. परंतु, यापैकी अनेक कामे अद्यापही झालेली नाहीत. ही कामे का झाली नाहीत? याची माहिती मी घेणार आहे. शहराचा विकास हाेण्यासाठी सर्व प्रयत्न करणार अाहे. तसेच कामामध्ये पारदर्शकता आणण्याचा माझा प्रयत्न राहील. राजकीय दबाव येतो, ही कल्पनाच मला मान्य नाही, असा कोणताही दबाव येत नाही, त्यासाठी आपणही काही प्रमाणात जबाबदार असतो, त्यामुळे चुकीचे कामच झाले नाही, तर दबाव येण्याचा प्रश्नच उद््भवणार नाही, असेही आयुक्त अजय लहाने म्हणाले. येणाऱ्या काळात शहर विकासासाठी सर्व अावश्यक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अजय लहाने
बुके आणण्यास दिला नकार
पदभारस्वीकारल्यानंतर स्वागत आलेच. मात्र, स्वागतासाठी कोणीही बुके अथवा फुले आणू नयेत, अशी सूचनावजा विनंती आयुक्त अजय लहाने यांनी केली. त्यामुळे प्रथमच आयुक्त रुजू झाल्यानंतर त्यांच्या दालनात बुके दिसली नाहीत.