आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहृत मुलीच्या शोधासाठी तीन पथके गठित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - अपहरण झालेल्या मनश्री लाकडे या बालिकेचा अद्यापही शोध लागला नसून, तिच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके गठित करण्यात आली आहे. या पथकांच्या माध्यमातून शोधकार्य सुरू असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार कैलास नागरे यांनी दिली.
मनश्री लाकडे या सहा वर्षीय बालिकेचे शुक्रवारी तिच्या घराजवळून अपहरण झाले. एका ३० वर्षीय महिलेने तिचे अपहरण केल्याची बाब समोर आली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करून शोधमोहीम राबवली. मात्र, मनश्री लाकडे हिचा शोध अद्यापही लागला नाही.

मनश्री लाकडेच्या शोधासाठी पोलिस उपनिरीक्षक शरद माळी, उपनिरीक्षक अशोक सूर्यवंशी आणि उपनिरीक्षक सरोदे यांच्या नेतृत्वात एकूण तीन पथके गठित करण्यात आली आहेत. गठित करण्यात आलेली तीनही पथके शोधासाठी विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणाच्या अनुषंगाने पोलिसांनी अनेक संशयितांची चौकशी केली आहे, सोशल मीडियावरही व्यापक प्रसिद्धी देण्यात आली आहे. यासोबतच मनश्रीचे छायाचित्रही सर्वत्र प्रकाशित केले आहे. त्यादृष्टीने पोलिसांचे तपास कार्य सुरू आहे.

सर्व बाजूंनी दिली तपासकार्याला गती
^अपहृत मनश्रीचाशोध घेण्यासाठी पोलिस यंत्रणा सर्व बाजूंनी तपास करत आहे. आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहोत. लवकरच आरोपींना ताब्यात घेऊ. कैलासनागरे, ठाणेदार, शहर पोलिस ठाणे
बातम्या आणखी आहेत...