आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Chief Minister Vasantrao Naik Krishi Awards Declare

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक कृषी पुरस्कारांची घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुसद - राज्याचे माजी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या ३६ व्या स्मृतीदिन सोहळा मंगळवारी १८ आॅगस्टला बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुधाकर नाईक प्रेक्षागृहात होत आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कृषी,महसूल, फलोत्पादन दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श गाव संकल्प प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डाॅ. केशव राज क्रांती राहतील. या वेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तबगार शेतकरी कृषी शास्त्रज्ञांचा वसंतराव नाईक कृषी पुरस्कार देऊन सन्मान करणार आहे. या पुरस्काराप्राप्त शेतकऱ्यांची नावे आज जाहीर केली आहेत.

वसंतराव नाईक शास्त्रज्ञ पुरस्काराचे मानकरी असे
डाॅ.सूर्यकांत पवार, तूर उत्पादन वाढीचे प्रयोग तूरीचे नवे वाण, डाॅ. विजय शेलार, राहुरी जि. नगर यांना मिळणार आहे. तर वसंतराव नाईक जलसंधारण पुरस्कार विजयकुमार इंगळे, विभागीय कृषी सहसंचालक,पुणे यांना मिळणार आहे.

वसंतराव नाईक कृषी पुरस्काराचे मानकरी
सीमाजाधव, चिंबळी जि. पुणे, संतोष कोंडे, केळवडे, जि.पुणे, स्नेहा बापट, दिवे आगर जिल्हा. रायगड, प्रकाश ठाकूर, नागांव जि. रायगड, रवींद्र महाजन, गारखेडा जि. जळगाव, संजय मोरे, नळविहिरा जि. जालना, लक्ष्मीबाई पारवेकर, सवना, जिल्हा यवतमाळ, सुधाकर बानाईत,मधापुरी जि. अकोला यांना हे पुरस्कार देणार आहेत.