आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..तर महाराष्ट्र दिनी अात्मदहनाचा शेतकऱ्याचा इशारा, एसडीओंच्या कक्षात दिला शेतकऱ्यांचा ठिय्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - शासनाने २२ एप्रिलपासून तूर खरेदी बंद केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज दुपारी अकोटचे उपविभागीय अधिकारी उदय राजपूत यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी २२ रोजी मार्केड यार्डात आलेली तूर खरेदी केली जाईल, असे ट्विटरवर जाहीर केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. तूर खरेदी न केल्यास अात्मदहन करण्याचा इशारा तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील शेतकऱ्याने साेमवारी तहसीलदारांना दिला.
 
शेतकरी संघटनेचे ललित बहाळे युवा नेते तुषार पुंडकर यांच्या नेतृत्वात शेतकरी आज एसडीओ उदय राजपूत यांच्या कक्षात धडकले. त्यांनी नाफेडव्दारे पुन्हा तूर खरेदी सुरू करावी, या प्रमुख मागणीसाठी त्यांनी राजपूत यांच्या कार्यालयात ठिय्या दिला. बाजार समितीच्या आवारात सध्या ५१० ट्रॉल्या भरून तूर आहे. ही तुर सुमारे ४० हजार क्विटंल आहे. खरेदी पुन्हा सुरु होईल, या आशेने शेतकऱ्यांनी तूर भरलेल्या ट्रॉल्या तेथेच ठेवल्यात दर ट्रॉली सुमारे ५०० ते १००० रुचे भाडे दररोज त्यांना द्यावे लागत आहे. त्यामुळे त्वरित तूर खरेदी सुरू करावी, अशी मागणी केली.
 
दरम्यान, २२ एप्रिलला बाजार समितीमध्ये असलेली तूर पुन्हा खरेदी केली जाईल, असे ट्विट मुख्यमंत्र्यांनी केल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनात ललित बहाळे, तुषार पुंडकर, बाळासाहेब फोकमारे, विशाल भगत, पंकज हाडोळे, विशाल उपासे, सागर उकंडे, सतीश देशमुख, लक्ष्मीकांत कौठकर, गजानन बोरोकार, विक्रांत ब्रोंदे, मोहन पोटदुखे, रामभाऊ खवले यांच्या अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.
 
वरिष्ठांना अवगत करू
नाफेडचा निर्णय बदलणे माझ्या अधिकारात नाही. शेतकऱ्यांच्या संतप्त भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवू. शेतकऱ्यांच्या भावना आम्ही समजू शकतो. निर्णय माझ्या हाती नाही.’’ - उदय राजपूत, उपविभागीय अधिकारी, अकोट
 
शेतकरी झाले त्रस्त
आत्महत्याग्रस्त भागात तरी शेतकऱ्यांसोबत शासनाने खेळू नये. ट्रॉलीच्या भाड्या पोटीच शेतकऱ्यांचे अर्धे उत्पन्न जात आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.’’
- तुषार पुंडकर, युवा नेते
 
शेतकरी हितासाठी लढू
आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. तूर खरेदीचा प्रश्न धसास लावू. शेतकरी हितासाठी आमचा लढा आहे. शेतकरी संकटात असताना आम्ही प्रशासनाला सोडणार नाही.’’
- ललित बहाळे, शेतकरी संघटना.

तर महाराष्ट्र दिनी अात्मदहन; शेतकऱ्याचा इशारा
तेल्हारा-  तूर खरेदी न केल्यास अात्मदहन करण्याचा इशारा तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील शेतकऱ्याने साेमवारी तहसीलदारांना सादर केलेल्या पत्रात दिला. दयाराम सिताराम वानखडे (वय ७३ वर्षे) असे इशारा दिलेल्या शेतकऱ्याचे नाव अाहे. तेल्हारा येथील काॅटन मार्केटमध्ये वानखडे यांनी तूर विक्रीसाठी अाणली. मात्र ‘तूर अाणू नये’, असा फलक मार्केटमध्ये लावण्यात अाल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले अाहे. शासनाने विना अट तूर खरेदी करावी. तूर खरेदी केल्यास मे राेजी अात्मदहन करण्यात येईल, असा इशारा दयाराम वानखडे यांनी दिला अाहे.
बातम्या आणखी आहेत...