आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आम्ही पत्रकार आहोत, असे सांगून खंडणी मागणाऱ्या चार तोतया पत्रकारांना अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेगाव- तुमच्या लॉजमध्ये अवैध धंदे चालतात, आम्ही पत्रकार आहोत, असे सांगून खंडणी मागणाऱ्या अकोला आणि वाशीम जिल्हयातील चार तोतया पत्रकारांना पोलिसांनी रंगेहाथ पकडून अटक केली आहे. आज १९ नोव्हेंबर रोजी पहाटे मंदिर परिसरात ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून बनावट ओळखपत्र, रेकॉर्डिंगचे साहित्य आणि मोबाईल जप्त केले आहेत. 


शेगावात लॉजेसचा प्रमुख व्यवसाय आहे. तुमच्या लॉजेसमध्ये अवैध व्यवसाय चालत असून त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे. आम्हाला लॉजेस चेक करण्याचा अधिकार आहे. पोलिस सुध्दा आमचे काही करू शकत नाही, असे बोलून अकोला आणि वाशीम जिल्ह्यातील चार तोतया पत्रकारांनी शेगावात रात्री धुमाकूळ घातला. हे तोतया पत्रकार असल्याचे समजल्यानंतर विशाल गेस्ट हाऊसचे व्यवस्थापक शेख मुजम्मील यांनी पोलिसांना पाचारण केले. 


पोलिसांनीही हा प्रकार पाहिला. यावेळी मद्यधुंद असलेल्या या आरोपींनी पोलिसांनाही जुमानले नाही. तेव्हा पोलिसांनी खाक्या दाखवून सर्वांना गाडीत टाकले. त्यांच्याकडून एक मारोती अल्टो कार, बनावट ओळखपत्र , रेकॉर्डिंगचे साहित्य आणि मोबाईल जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये जितेंद्र राऊत रा. वाशीम, राजकुमार वानखडे रा. वाशीम, मयूर महल्ले रा. पिंजर, आणि दीपक ठाकरे रा. मंगरूळपीर असे या तोतया पत्रकाराची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...