आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर आता चारचाकी वाहन उभे करणे पडणार महागामध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यासाठी शहरात जसे टोइंग पथक आहे. त्याचप्रमाणे आता पोलिस प्रशासनाने रस्त्यावर उभ्या चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यासाठी टोइंग कार्यान्वित केले आहे. शनिवारी या टोईंगने चार चारचाकी वाहनांवर कारवाई केली.
वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी रस्त्यावर उभ्या दुचाकींवर कारवाई करण्यासाठी टोईंग वाहन शहरात आधीपासूनच दाखल आहे. मात्र, रस्त्यावरील दुचाकी उचलायच्या चारचाकींवर कोणतीही कारवाई करायची नाही. म्हणून दुचाकीधारकांमध्ये असंतोष होता. कारवाईत दुजाभाव केल्या जात असल्याचा आरोप पोलिसांवर होत होता. तशा तक्रारीही जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे शेकडोने दाखल झाल्या. त्यावर सकारात्मक विचार करून जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांनी रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यासाठी टोईंगचे कंत्राट दिले आहे. त्यानुसार गुरुवारपासून हे टोईंग पथक शहरात दाखल झाले. त्यानुसार रस्त्यावर उभ्या चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यास पाेलिसांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच शहरात चारचाकी वाहनांवर कारवाईसाठी टोईंग कार्यान्वित करण्यात आले. त्यामुळे आता पोलिस रस्त्यावर उभ्या दुचाकीवर ज्याप्रमाणे कारवाई करतात. त्याचप्रमाणे चारचाकी वाहनांवर करतील काय, हे लवकरच दिसून येणार आहे.

कार उचलून नेल्या जातात वाहतूक शाखेत
रस्त्यावर रहदारीला अडथळा ठरत असलेल्या उभ्या कार उचलून वाहतूक शाखेत नेण्यात येत आहेत. त्यानंतर त्यांना दंड करून सोडून देण्यात येत आहेत. आता कार चालकांवरही कारवाई होणार असल्यामुळे त्याची अंमलबजावणी कशी होते. याकडे लक्ष आहे.

दिवसभरात केवळ तीनच वाहनांवर कारवाई
वाहतूक पोलिसांच्या दिमतीला कारवर कारवाई करण्यासाठी टोईंग दाखल झाले असले, तरी पाहिजे त्या प्रमाणात दोन दिवसांत पाहिजे तशी कारवाई झाली नाही. शुक्रवारी केवळ चार कारवर कारवाई करण्यात आली, तर शनिवारी तीनच कारवर कारवाई केली. त्यामुळे शहरात एका दिवशी चारच चारचाकी वाहने रस्त्यावर उभी असतात काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

बातम्या आणखी आहेत...