आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुंडाबळीतील चार अाराेपींना कारावासाची सुनावली शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - विवािहतेच्या मृत्यूप्रकरणी शुक्रवारी न्यायालयाने पतीसह सासरच्या मंडळीच्या चाैघांना कारावासाची शिक्षा ठाेठावली. न्यायालयाने अाराेपींना अार्थिक दंडही ठाेठवला. ही घटना २०११ मध्ये अालेगाव येथे घडली हाेती.
बाळापूर येथील गुलशेरखा समशेरखा हे व्यवसायासाठी चान्नी पाेिलस स्टेशनच्या हद्दित असलेल्या आलेगाव येथे स्थाियक झाले. २४ नाेव्हेंबर २०१० राेजी त्यांची मुलगी साजीदा खानम हीचा विवाह मोहम्मद जावेद मोहम्मद इस्माईलशी(रा. अालेगाव) झाला. काही दिवस संसार व्यवस्थित सुरु हाेता. मात्र नंतर तिला त्रास सुरु झाला. २२ एप्रिल २०११ राेजी प्रकृती अचानक बिघडल्याने तिला अकाेला येथील सर्वेापचार रुग्णालयात भरती करण्यात अाले. तिच्या माहेर मंडळीनेही रुग्णालयात धाव घेतली. मात्र तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी विष प्राषनाने मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. याप्रकरणी चान्नी पाेिलस ठाण्यात तिचा पती मो. जावेद मो. इस्माईल, दिर मो. रफीक मो. इस्माईल, सासू नजमा बी मो. इस्माईल आणि सासरा मो. इस्माईल शेख इब्राहीम या चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात अाला. याप्रकरणाचा तपास तत्कालीन ठाणेदार शंकर शेळके यांनी करुन दाेषाराेप पत्र न्यायलयात सादर केले. या खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने सहा साक्षीदार तपासले. दाेन्ही बाजूच्या वकिलांनी केलेले युक्तीवाद अािण उपलब्ध पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने चारही अायाेपींना शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अॅड. किरण खोत यांनी कामकाज पाहिले.

अॅटाेरिक्षाखरेदीसाठी मािगतले हाेते पैसे : साजीदाखानम मोहम्मद जावेद मोहम्मद इस्माईल यांना संसार सुखाने सुरु हाेता. मात्र नंतर तिच्या सासरच्यांनी माहेरवरून अॅटाेरिक्षा खरेदी करण्यासाठी ५० हजार रुपये आणण्याकरिता तगादा लावला. ही मागणी पूर्ण हाेत नसल्याने तिचा , या कारणावरुन तीचा छळ सुरु केला. छळ असह्य झाल्याने ती २२ एप्रिल २०११ रोजी सकाळी सात वाजता माहेरी परत गेली. तिने सासरी जाण्यास नकार दिला. मात्र आई-वडीलांनी समजूत घातल्याने तीन त्याच दिवशी सकाळी ११ वाजता ती सासरी परत गेली. मात्र त्यानंतर तासातच तीची प्रकृती गंभीर असल्याचे तीच्या आई-वडीलांना सांगण्यात आले हाेते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

वडिलांनी नाेंदवली हाेती तक्रार : मृत्यूप्रकरणीमुलगी साजीदा खानम हिचे वडिल गुलशेरखा यांनी चान्नी पोलिस ठाण्यात तक्रार नाेंदवली हाेती. यातक्रारीवरुन पोलिसांनी तीचा नवरा मो. जावेद मो. इस्माईल, दिर मो. रफीक मो. इस्माईल, सासू नजमा बी मो. इस्माईल आणि सासरा मो. इस्माईल शेख इब्राहीम या चौघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०४ ब, ४९८ अ, ३०६, २०१, ३४ नुसार गुन्हा दाखल केला हाेता.

अशी झाली शिक्षा: विवािहतेच्यामृत्यूप्रकरणी न्यायालयाने चारही अाराेपींना शिक्षा सुनावली. आरोपींना ३०४ अन्वये दोषी ठरवले. सात वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा, तर ४९८ अन्वये एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि हजार रुपयांचा दंडही ठोठावला. दंड भरल्यास आणखी तीन महिन्यांची शिक्षा भाेगावी लागणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...