आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्रांनीच केला मित्राच्या बहिणीवर सामूहिक बलात्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गुंड प्रवृत्तीच्या दारुड्या मित्रांनीच आपल्या मित्राच्या सख्ख्या बहिणीवर बलात्कार केला. ही घटना शुक्रवारी रात्री १२.३० वाजता खदान परिसरातील आळशी प्लॉट येथे घडली. विशेष म्हणजे, त्या पीडित बहिणीचा भाऊ त्याच्या दोन मित्रांसोबत येथेच्छ दारू पिऊन तर्रर्र होता आणि रात्री १२.३० वाजता मित्रांना भूक लागली म्हणून त्यांना नाष्टा आणण्यासाठी बसस्थानकावर गेला होता. याच दरम्यान, मित्रांनी त्याच्या बहिणीवर हात टाकला. याप्रकरणी दोन जणांना कानशिवणी येथून शनिवारी रात्री उशिरा अटक केली आहे.

खदान परिसरातील आळशी प्लॉट येथे आई-वडील हयात नसल्यामुळे ३६ वर्षीय गतिमंद बहीण तिच्यापाठचा भाऊ हे दोघेच राहतात. त्यांचा एक मोठा भाऊ नागपूरला नोकरी करतो. अकोल्यात बहिणीसोबत राहत असलेल्या भावाचे मित्र गुंड प्रवृत्तीचे आहेत. शुक्रवारी रात्री हे तिघेही बारमध्ये जाऊन येथेच्छ दारू प्यायले. त्यानंतर तिघे जण रात्री १२ वाजता त्याच्या मित्रांच्या घरी त्याला सोडून देण्यासाठी आले. घरी आल्यावर भूक लागल्याचा बहाणा त्यांचेच दोन मित्र अनुप उर्फ गुड्डू परिहार चंद्रकांत किशोर निखाले यांनी केला. तुझ्या घरी आलो काही तर खाऊ घाल म्हणून त्यांनी मित्राला म्हटले, एवढ्या रात्री खायला काही नाही म्हटल्यावर बसस्थानकावरून पोहे तरी घेऊन ये, असे म्हणताच तो एकटाच बसस्थानकावर पोहे आणण्यासाठी गेला. यादरम्यान, दोघेही त्याच्या घरात घुसले आणि मित्राच्या बहिणीचे तोंड दाबून तिला घरापासून काही अंतरावर एका बोळीत नेले आणि तेथे तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर तिला तेथेच सोडून देऊन दोघेही पसार झाले. काही वेळाने मित्रांसाठी पीडितेचा भाऊ पोहे घेऊन आला.

मात्र, हे दोघेही दिसल्यामुळे तो त्यांच्या घरी गेला. तेथेही ते दिसून आले नाही. त्यानंतर तो परत घरी आला असता त्याला बहीण दिसली नाही. त्याने आजूबाजूला तिचा शोध घेतल्यावर रात्री वाजता ती दिसून आली. बहिणीला विचारपूस केली असता तिने काहीही सांगितले नाही. मात्र, त्याला शंका आल्याने त्याने सकाळी नातेवाइकांना बोलावले. त्या वेळी त्याच्या बहिणीने आपबिती सांगितली. त्यानंतर खदान पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी अनुप उर्फ गुड्डू परिहार चंद्रकांत किशोर निखाले या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

आरोपीगुंड प्रवृत्तीचे : अनुपउर्फ गुड्डू परिहार चंद्रकांत किशोर निखाले हे दोन्ही आरोपी गुंड प्रवृत्तीचे आहेत. काही दिवसांपूर्वी व्यापारी पटेल यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांनी साडेपाच लाख रुपये लुटले होते. या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला आहे, तर त्यांचे मित्र अजूनही कारागृहात आहेत.

मैत्रीला काळिमा
तिघांचीही घनिष्ठ मैत्री. आपले मित्र असे काही करणार याचा विचारही पीडित मुलीच्या भावाने कधी केला नसेल. आपले मित्र उपाशी राहू नये, म्हणून त्यांना दारी बसवून मध्य रात्री तो पोहे आणण्यासाठी बसस्थानकावर गेला. मात्र, वासनांध मित्रांना त्याचे काय सोयरसुतक? त्यांनी संधीसाधूपणा करत मित्राची बहीण ती आपली बहीण हे िवसरून तिला आपल्या वासनेचे बळी बनवले.