आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा, प्रक्रिया सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - राज्यशासनाने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत १८ ऑक्टोबरपासून कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यामध्ये दीड लाखापर्यंत कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांना थेट मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे कर्ज बेबाक प्रमाणपत्र दिले जाणार आहे. 
 
गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या रकमेची प्रतिक्षा आहे. जिल्ह्यामध्ये मुदतीपर्यंत कर्जमाफीचे ऑनलाईन लाख ६७ हजार ४७५ शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यात आली. कुटूंब व्याख्येत दोन लाख ५० हजार ७४५ कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले आहे. त्यानुसार दीड लक्ष रुपयापर्यंत कर्ज माफ झालेल्या प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात कर्ज बेबाक प्रमाणपत्र दिल्या जाणार आहे. या कार्यक्रमाचे राज्यस्तरीय आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार असून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बुधवार १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कार्यक्रमात करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत कर्ज पूर्णपणे तर दीड लाखांवरील कर्ज एकरकमी पद्धतीने मिळणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर, अर्जांची छाननी लेखा परीक्षण पूर्ण करण्यात आले. ऑडीट केलेल्या अर्जांच्या फाईली शासनाकडे सादर करण्यात आल्या. यामध्ये जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. 
 
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात जिल्हास्तरीय कार्यक्रम दुपारी १२ वाजता होणार आहे. यावेळी पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात शेतकरी कुटूंबाचा सन्मान करण्यात येणार असून मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहे. तसेच मुंबईत प्रत्येक जिल्ह्यातील दोन शेतकरी कुटूंबाना आमंत्रित करून मुख्य कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी कळविले आहे. 
बातम्या आणखी आहेत...