आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्री गणरायाचे आज वाजतगाजत आगमन, सकाळपासून स्थापनेसाठी मुहुर्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - श्रीगणेशाच्या स्थापनेसाठी घराघरात आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तयारी केली आहे. सोमवार, सप्टेंबर रोजी चतुर्थीला गणरायाची भक्तिभावाने स्थापना करण्यात येणार आहे. सोमवारी सकाळपासूनच स्थापनेसाठी मुहुर्त आहे. शुद्ध चतुर्थी असल्याने दिवसभर शुभपर्व असल्याची माहिती वेशासं श्रीरामशास्त्री गदाधर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.सकाळी ६.३० ते वाजेपर्यंत अमृतवेळ तर ९.३० ते ११ वाजेदरम्यान शुभवेळ आहे. शुद्ध चतुर्थी असल्याने अन्य वेळाही स्थापनेसाठी चांगल्या आहेत. विशेष म्हणजे तृतिया किंवा पंचमी लागून आलेली नाही. गणपतीला २१ दुर्वा, शमीपत्र, लाल फूल, लाल किंवा केशरी रंगाचे वस्त्र, केशरी चंदन, गुळ, खोबरे, नारळ, मोदक गणपतीला विशेष प्रिय आहे.
शहरात लालबागचा राजा, मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळ, सिंधी कँपमधील श्री बालक गणेशोत्सव मंडळ, अर्जून समाज गणेशोत्सव मंडळ, कल्याण गणेशोत्सव मंडळाच्या आकर्षक मूर्ती पाहण्यासाठी लोकांची झुंबड असते. दरवर्षी नेत्रदिपक देखावे या ठिकाणी सादर करण्यात येत असतात. ते पाहण्यासाठी शहरातील तसेच बाहेरच्या भागातूनही लोक येत असतात. हौशी वाद्यवृंद गणपतीसमोर ताल धरतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी तयारी सुरू केलेली आहे. लालबागच्या राजाचा थाट निराळा असतो. शिवाभाऊ मोकळकर यांच्या निवासस्थानापासून मिरवणुकीने गणपतीला माळी चाैकात आणले जाते. मूर्ती तयार होताना पाहण्यासाठी बालगोपाल गर्दी करत असतात. आणि सोमवारी मूर्तींची विधीवत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अकोल्यामध्ये उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. यंदा दमदार पाऊस झाल्याने लोकांमध्ये उत्साह दिसत आहे. मंडळांनी भव्य तयारी केलेली आहे.

शास्त्रानुसार साजरी करा श्री गणेश चतुर्थी
श्री गणेशमूर्ती घरी कशी आणावी
श्रीगणेशमूर्ती हातात घेणाऱ्याने हिंदू पद्धतीनुसार (धोतर, सदरा) वेशभूषा करावी. मूर्तीवर वस्त्र घालावे. मूर्तीचे मूख मूर्ती आणणाऱ्याकडे अन् पाठ समोरच्या दिशेस असावी. मूर्तीचे मूख समोरील दिशेस ठेवावे. मग मूर्तीला आैक्षण करून ती घरात आणावी.
शाडू मातीपासून बनवलेली गणेशमूर्ती घरी आणा
अध्यात्म शास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती शाडूमातीपासून बनवलेली असावी. मूर्ती आकाराने लहान असावी.
>पूर्वपूजा : श्रीगणेशाची स्थापना पूर्व दिशेला पाटावर करावी. पाटाच्या मध्यभागी एक मूठ धुतलेले अखंड तांदूळ ठेवून त्यावर स्वस्तिक काढावे. तांदळावर मूर्ती ठेवावी. ‘प्राणप्रतिष्ठा’ करताना पूजकाने मूर्तीच्या हृदयाला उजवा हात लावून मंत्र म्हणावा. यानंतर षोडषोपचार किंवा पंचोपचार पूजा करावी.
>मध्यपूजा : गणेशमूर्तीघरी असेपर्यंत प्रतिदिन सकाळ, संध्याकाळी तिची पूजा करावी. सर्वांनी एकत्र येऊन आरती, मंत्रपुष्पांजली म्हणावी.
>उत्तरपूजा : पंचोपचारपूजा मूर्ती विसर्जन करण्यापूर्वी करावी. त्यानंतर आरती करुन मंत्रपुष्पांजली म्हणावी. विशिष्ट मंत्र म्हणून श्री गणपतीच्या मूर्तीवर अक्षता वाहाव्या आणि उजव्या हाताने ती स्थानापासून थोडीशी हलवावी. नंतर मूर्ती शिदोरीसह जलाशयात किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करावी.
श्री गणेश चतुर्थीला करावयाची श्री गणेशाची उपासना
>प्रार्थना : हेबुद्धीदाता श्री गणेशा, मला सदबुद्धी दे. हे विघ्नहर्त्या, जीवनात येणाऱ्या सर्व संकटांचे निवारण कर.
>नामजप : गणेशोत्सवाच्याकाळात आेम गँ गणपतये नम: हा नामजप जास्तीतजास्त वेळ करावा. नामजप एकट्याने तसेच सामहिकरित्याही करू शकतो.
> स्तोत्रपठण : श्रीगणेश चतुर्थीच्या काळात प्रतिदिन कुटुंबातील सर्वांनी श्री गणेशमूर्तीसमोर बसून ‘श्री गणपती अथर्वशिर्ष’ वा ‘गणपती संकष्टनाशन स्तोत्र’ म्हणावे.
*संकलन : प्रा.श्रीकांत भट, अकोला.
बातम्या आणखी आहेत...