आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसांपासून वाशीममध्ये पाणी भरणे सुरू, पण दोनच वॅगन भरल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला/मालेगाव - लातूरला पाणीपुरवठा करण्यासाठी अकोल्यातून सहा वॅगनची 'जलराणी' बुधवारी दुपारी अकोल्याहून रवाना हाेत आहे. यापैकी दोन वॅगनमध्ये मालेगाव तालुक्यातील अमानवाडीतून येथून पाणी भरण्यात आले तर चार वॅगन अकोला रेल्वे स्टेशनवर भरण्याचे काम मंगळवारी रात्रभर सुरू होते. दुष्काळाने होरपळणाऱ्या लातुरकरांची तहान आता अकोला आणि वाशिम जिल्हा भागवत आहे.

पहिली पाणी एक्सप्रेस मिरजेतून लातूरला पोहचल्यानंतर आता इतर जिल्ह्यांतून लातूरची तहान भागवण्यात येत आहे. दोन दिवसांपासून वाशीम जिल्ह्यातील अमानतवाडी येथे वॅगनमध्ये पाणी भरण्याचे काम सुरु होते. मात्र तांत्रिक अडचणीमुळे त्यात बाधा आल्याने हीच सहा वॅगनची गाडी अकोला रेल्वस्थानकावर मंगळवारी दुपारी पोहचली. रेल्वेस्थानकावर फलाट क्रमांक पाच वर रात्री उशिरापर्यंत पाणी भरण्याचे काम सुरु होते.
दरम्यान, वाशीमची जनता पाणी टंचाईच्या भीषणतेने होरपळत असतानाही जिल्ह्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याऐवजी लातूरला पाणी देण्यावर स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त झाली. पाणी भरण्यासाठी वाॅटर वॅगन अमानवाडी रेल्वेस्टेशनवर दोन दिवसांपूर्वी दाखल झाल्या. त्यापैकी वॅगन भरल्या. अत्यल्प प्रमाणात पाणी वीज भारनियमन असल्याने दोनच वॅगन भरल्या गेल्या असल्याने मंगळवार, १९ एप्रिल रोजी वाशीमवरून ही जलराणी अकोला येथे पाठवण्यात आली. ती उद्या दुपारी लातूरला रवाना होणार असल्याचे रेल्वेचे वरिष्ठ अभियंता पुनीतकुमार यांनी सांगितले.

वाशीम जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी आेरड सुरू असताना लातूरला पाणी पाठवण्याचे कारण काय, असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला. रेल्वे वॅगनमध्ये पाणी भरणे सुरू असताना लोकांमधील नाराजी प्रकट झाली. पोलिसांनी लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची नाराजी कायम होती. आधी इथल्या लोकांना पाणी द्या, मग अन्यत्र पाठवा, असे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.