आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक स्थळावर केली कारवाई, सकाळी पाच वाजता चालला गजराज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार २००९ नंतरची तसेच रहदारीत अडथळा ठरणारी अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याची कारवाई महापालिका प्रशासनाने पुन्हा सुरु केली आहे. २२ ऑक्टोंबरला पहाटे पाच वाजता महापालिका प्रशासनाने सर्वोपचार रुग्णालया जवळ रस्त्यालगत असलेले श्री गजानन महाराजांचे मंदिर भुईसपाट केले. गजानन महाराज यांच्या मूर्तीला विधिवत काढून ही कारवाई करण्यात आली.

सर्वोच्च न्यालायाच्या आदेशान्वये शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळाची यादी तयार करण्यात आली होती. यात पहिल्या टप्प्यात २००९ नंतरच्या अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले. २००९ नंतरची एकुण ५१ अनधिकृत धार्मिक स्थळावर ही कारवाई केली जाणार होती. यापैकी आता पर्यंत ४५ पेक्षा अधिक अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई करण्यात आली. दरम्यान काही दिवसापासून ही मोहिम थंडबस्त्यात पडली होती.

अशोक वाटिका ते सरकारी बगीच्या या मार्गाच्या कॉक्रीटीकरणाच्या कामास प्रारंभ झाला. या रस्त्याची रुंदी वाढवण्यात आली. या रस्त्यालगत २००९ नंतर मंदिर बांधण्यात आले होते. मंदिर बांधणाऱ्या संबंधितास नोटीस दिल्या नंतर संबंधिताने नागपूर हायकोर्टात धाव घेतली होती. परंतु नागपूर हायकोर्टाने हे प्रकरण फेटाळून लावले. त्यामुळे प्रशासनाने पहाटे पाच वाजता ही कारवाई केली. ही कारवाई उपायुक्त समाधान सोळंके, सहाय्यक आयुक्त दिपाली भोसले, नायब तहसिलदार प्रतिक्षा तेजनकर, अतिक्रमण अधिकारी राजेंद्र घनबहादुर, विष्णु डोंगरे, नगररचना विभागाचे संदीप गावंडे, राजेंद्र टापरे, क्षेत्रीय अधिकारी कैलास पुंडे यांच्यासह अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक आदींच्या पथकाने केली.

कारवाईशांततेत : पहाटेपाच वाजता कारवाई सुरु करण्यात आल्याने मॉर्निग वॉकला जाणाऱ्या नागरिकांनाच याची माहिती मिळाली. त्यामुळे कारवाई दरम्यान मोठा जमावही जमला नाही परिणामी कारवाई शांततेत पार पडली.

उर्वरित कारवाई लवकरच :
५१ अनधिकृत धार्मिक स्थळापैकी ४५ पेक्षा अधिक धार्मिक स्थळावर कारवाई करण्यात आली आहे. यापैकी उर्वरित तसेच रहदारीत अडथळा ठरणाऱ्या धार्मिक स्थळांवरही येत्या काही दिवसात पहाटेच कारवाई केली जाणार आहे.
कारवाईबाबत पाळली गुप्तता
शहरात धार्मिक स्थळावर कारवाई करण्यात येणार असल्याने याबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. तसेच कारवाई दरम्यान कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी ही कारवाई पहाटे पाच वाजता करण्यात आली. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी पहाटे साडेतीन ते चार वाजल्यापासूनच घटनास्थळी पोचले होते. सकाळी पाच वाजता ही कारवाई करण्यात अाली.

चोख पोलिस बंदोबस्त
कारवाई दरम्यान चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. ठाणेदार अनिल जुमळे, प्रकाश सावकार, कैलास नागरे, डी.सी.खंडेराव, गजानन शेळके, अन्वर शेख यांच्यासह पोलिस ताफा तैनात करण्यात आला होता.
बातम्या आणखी आहेत...