आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यास २२ विभागीय स्पर्धांचे यजमानपद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - यंदाच्याशालेय क्रीडा स्पर्धांच्या मोसमाला प्रारंभ झाला असून, जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन सर्व जिल्हास्तरावर राज्यभरात होत आहे. जिल्हास्तरानंतर होणाऱ्या अमरावती विभागीय स्पर्धा महत्त्वाच्या असून, यंदा अकोल्यास २२ विभागीय शालेय स्पर्धांचे यजमानपद मिळाले आहे.
शैक्षणिक सत्र २०१५-१६ मध्ये अनेक नवीन खेळांचा समावेश झाल्याने शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये तब्बल ८० खेळांचे आयोजन जिल्हास्तरावर होत आहे. तसेच विभागीय, राज्य स्पर्धांच्या आयोजनाचेही नियोजन क्रीडा विभागामार्फत करण्यात येत असून, अकोल्यास राज्य स्पर्धांसह २२ विभागीय स्पर्धांचे यजमानपद देण्यात आले आहे. यामध्ये ट्रेडिशनल रेसलिंग स्पर्धा वसंत देसाई क्रीडांगण, मुष्टियुद्ध वसंत देसाई क्रीडांगणावर होतील, तर भारोत्तोलन स्पर्धा लाल बहादूर शास्त्री क्रीडांगणावरील प्रशिक्षण केंद्रात, टेनिक्वाइटच्या विभागीय स्पर्धा संत गाडगे महाराज विद्यालय, मूर्तिजापूर येथे आयोजित होतील. १७ १९ वर्षे वयोगटातील मुलांच्या कॅरम स्पर्धा विदर्भ कॅरम अॅकेडमी, जठारपेठ, १९ वर्षांआतील मुलामुलींच्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धा लाल बहादूर शास्त्री क्रीडांगण, १९ वर्षांआतील मुलामुलींच्या सेपाक टकरा विभागीय स्पर्धा वसंत देसाई क्रीडांगणावर होणार आहेत, तर १४, १७, १९ वर्षांआतील मुलामुलींच्या नेटबॉलच्या स्पर्धा जे. बी. शाळा, मूर्तिजापूर येथे होणार आहेत. १४, १७, १९ वर्षांआतील लॉन टेनिसच्या स्पर्धा पोलिस कवायत मैदान, तर फुटबॉलच्या १४ वर्षांआतील मुलामुलींच्या स्पर्धा लाल बहादूर शास्त्री क्रीडांगणावर होणार आहेत. १४, १७ वर्षांआतील फ्री स्टाइल कुस्ती स्पर्धा संत गाडगेबाबा व्यायाम शाळा, शिवाजीनगर, तर रोलर स्केटिंगच्या स्पर्धा खंडेलवाल स्केटिंग रिंग, गोरक्षण रोड येथे होतील. रोलर हॉकीच्या १७, १९ वर्षांआतील मुलामुलींच्या स्पर्धा खंडेलवाल स्केटिंग रिंगवरच होणार आहेत. १९ वर्षांआतील वयोगटाच्या हपकिडो वसंत देसाई क्रीडांगणावर, तर १४, १७ वर्षं वयोगटाच्या कबड्डी स्पर्धा जय बजरंग विद्यालय, रुस्तमाबादला होणार आहेत. १४ वर्षे वयोगटाच्या बास्केटबॉल, १९ वर्षांआतील मुलामुलींच्या डान्स स्पोर्ट््स, १९ वर्षे वयोगटाच्या पिकलबॉल, १९ वर्षे वयोगटाच्या सॉफ्टटेनिस स्पर्धा वसंत देसाई क्रीडांगणावर होतील. या स्पर्धांमध्ये यजमान अकोल्यासह अमरावती, बुलडाणा, वाशीम, यवतमाळच्या संघांचा समावेश राहील. स्पर्धेतील विजयी संघ निवड झालेले खेळाडू राज्य स्पर्धेत आपल्या विभागाचे नेतृत्व करतील.

महिला क्रीडा स्पर्धा, ग्रामीणचे आयोजन
शालेयक्रीडा स्पर्धांसोबतच विभागीय महिला क्रीडा स्पर्धांमध्ये मैदानी, लॉन टेनिस हँडबॉल स्पर्धांचे यजमानपद अकोल्यास मिळाले असून, या स्पर्धा वसंत देसाई क्रीडांगणावर होतील, तर ग्रामीण क्रीडा स्पर्धांमध्ये मैदानी कुस्ती स्पर्धांचे आयोजन अकोल्यात होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...