आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष: फूटपाथवरचा गणेश भोसलेची विदर्भ क्रिकेट संघात निवड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- रस्त्याच्याकडेने फूटपाथवर राहणारा चिमुकला, रोज मैदानावर क्रिकेट खेळणाऱ्या पोरांना न्याहाळायचे, त्यांच्यासोबत कधीतरी मैदानात खेळायचे असे करत हळू हळू क्रिकेटची गोडी लागली आणि आज थेट तो विदर्भ संघात पोहोचला. ही कोणत्या चित्रपटाची कथा नव्हे तर अकोला क्रिकेट क्लबचा खेळाडू गणेश भोसले याने हे करून दाखवले आहे. फूटपाथवर राहणाऱ्या गणेशची १६ वर्षा खालील विदर्भ क्रिकेट संघात निवड झाली आहे. 


अकोला किक्रेट क्लबचा फिरकीपटू गणेश भोसले याची बिसीसीआय अंतर्गत डिसेंबर पासून रायपूर येथे होणाऱ्या सामन्यांसाठी १६ वर्षाखालील विदर्भ क्रिकेट संघात निवड झाली आहे. गणेश भोसले याने या सिझन मध्ये झालेल्या सर्व निवड चाचणी सराव सामन्यात गोलंदाजीत अत्यंत उल्लेखनिय कामगिरी केल्यामुळे त्याची विदर्भ संघात निवड झाली आहे. 


घरात रोजच्या जेवणाची सोय देखील नाही. अकोला क्रिकेट क्लब मैदानाच्या समोरील फूटपाथवर दामू नावाच्या व्यक्तीचे कुटूंब अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. दामू यांनी भाची भारती भोसले यांचा हा लहान मुलगा. गणेश मैदानावर खेळणाऱ्या मुलांना पाहण्यात रस घ्यायचा. अकोला क्रिकेट क्लबने त्याची खेळातील आवड पाहिली आणि त्याला प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली. गणेशला इतर खेळाडूंच्या बरोबरीने प्रशिक्षण मिळू लागले. कधी विचलीत झाला तर प्रशिक्षकांचा ओरडा देखील त्याने खाल्ला. अकोला क्रिकेट क्लबचे सर्व पदाधिकारी, सदस्य, अनेक लोकांनी त्याला खेळासाठी साहित्य, ड्रेस, बूट घेण्यासाठी सहकार्य केले. त्याच्या या निवडीबद्दल अकोला क्रिकेट क्लबचे अध्यक्ष नानूभाई पटेल, उपाध्यक्ष विजय तोष्णीवाल, सचिव विजय देशमुख, सहसचिव कैलाश शाह, ऑडीटर दिलीप खत्री, कर्णधार भरत डिक्कर, सदस्य अॅड. मुन्ना खान, गोपाळराव भिरड, शरद अग्रवाल, माजी कर्णधार विवेक बिजवे, क्रीडा परिषद सदस्य जावेद अली, परिमल कांबळे आदींनी अभिनंदन केले. 


मेहनतीचे फळ 
गणेश भोसलने क्रिकेट मध्ये रुची दाखवली. अनेक वेळा प्रशिक्षकांचा ओरडा देखील खाल्ला. तरी त्याने जिद्द सोडली नाही. अकोला क्रिकेट क्लबच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांचे सहकार्य आणि त्याची जिद्द यातून त्याने हे यश मिळवले. त्याची ही निवड म्हणजे त्याच्या मेहनतीचे फळ आहे.’’ 
-भरत डिक्कर, कर्णधार अकोला क्रिकेट क्लब तथा जिल्हा संयोजक, व्हीसीए 


शाळेचा गंधही नाही 
शाळा,शालेय अभ्यासक्रम, परीक्षा, स्पर्धा यातील कोणत्याच गोष्टीचा गंध गणेशला नाही. दिवसभर मैदानावर रात्री फूटपाथवर राहणाऱ्या गणेशचा शाळेशी कधी संबंध आलाच नाही. मात्र, अकोला क्रिकेट क्लबचा खेळाडू म्हणून त्याने नेहमीच चमकदार कामगिरी केली. 

बातम्या आणखी आहेत...