आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदारांनी भरली वर्गणीच्या रूपात मंडळांच्या दंडाची रक्कम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - परवानगी घेता गणेश मंडळांनी विविध कंपन्यांच्या उभारलेल्या स्वागत कमानीला प्रशासनाने दंड आकारला. या प्रकरणात तडजोड होत नसल्याचे पाहून अखेर दंडाची रक्कम आमदारांनी दिलेल्या वर्गणीतून भरावी लागली. हा प्रकार १२ सप्टेंबर रोजी रतनलाल प्लॉट परिसरात घडला.
सार्वजनिक गणेश मंडळांजवळ विविध कंपन्यांनी स्वागत कमानी उभारल्या. या कमानींच्या माध्यमातून जाहिरात केली. परंतु स्वागत कमानी लावताना घेतलेली परवानगी सार्वजनिक गणेश मंडळांना भोवली.

महापालिका क्षेत्रात विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी स्वागत कमानी उभारल्या आहेत. यात काही मंडळांनी मंडळाच्या नावाने स्वागत कमानी उभारल्या, तर काही सार्वजनिक गणेश मंडळांनी विविध कंपन्यांकडून देणगी घेऊन कंपनीकडून स्वागत कमानी उभारल्या आहेत. अनेक भागांत मुख्य रस्त्याच्या मधोमध या कमानी उभारण्यात आल्या आहेत. या कमानींच्या माध्यमातून कंपन्यांनी उत्पादनाच्या जाहिराती केल्या आहेत. या कमानींमुळे वाहतुकीत अडथळा येत आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने १२ सप्टेंबरला रतनलाल प्लॉट भागातील एका मंडळाने उभारलेल्या स्वागत कमानीबाबत दंड आकारला. या स्वागत कमानी उभारताना महापालिका अतिक्रमण विभागाची परवानगी घेतली नव्हती. मंडळाने उभारलेल्या कंपनीच्या तीन स्वागत कमानींना प्रत्येकी दहा हजार रुपये दंड आकारला. दंड आकारण्यावरून मंडळाचे कार्यकर्ते आणि महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये वादही झाला. हा प्रकार समजल्यानंतर आमदार रणधीर सावरकर घटनास्थळी दाखल झाले. या दरम्यान स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल तसेच आमदार गोपीकिशन बाजोरीयासुद्धा दाखल झाले. त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रशासनाने दंड कायम ठेवला. अखेर आमदार रणधीर सावरकर यांनी संबंधित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ३० हजार रुपयांची वर्गणी दिली. मंडळाने या वर्गणीतून दंडाची रक्कम भरली.
बातम्या आणखी आहेत...