आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ganesh God Immersion For Two Half Thousand Police

गणेश विसर्जनासाठी अडीच हजार पोलिस जवान तैनात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- गणेशविसर्जन शांततेत पार पडावे, यासाठी पोलिस प्रशासनाने अॅक्शन प्लॅन तयार केला असून, जिल्ह्यात २,४७४ पोलिस जवान तैनात करण्यात आले आहेत. त्यात एसआरपीएफ, सीआरपीएफ, क्यूआरटी आरसीपीच्या सहा कंपन्यांचा समावेश आहे. गणेश मिरवणूक मार्गावर पोलिस प्रशासनाच्या वतीने २३ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. या कॅमेऱ्यांचे नियंत्रण ताजनापेठ पोलिस चौकी पोलिस नियंत्रण कक्षात असणार आहे. मिरवणुकीदरम्यान, पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांनी केले.
ऑगस्टते सप्टेंबरदरम्यान गणेश उत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यात मोहल्ला समिती शांतता समितीच्या बैठका, तसेच गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. गणेश उत्सवादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने पावले उचलली असून, असामाजिक तत्त्वांवर कारवाई करण्यात येत आहे. एका महिन्यामध्ये पोलिस प्रशासनाने १५० गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. त्यातही १०७, १५१, ११० कलमान्वये, मुंबई पोलिस कायदा, अवैध दारू, जुगार आणि आर्म अ‍ॅक्टनुसार कारवाया करण्यात आल्या आहेत.
यापूर्वीच अमरावती विभागाचे पोलिस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप चव्हाण, सिटी कोतवाली पोलिस ठाण्याचे ठाणेदार अनिरुद्ध अढाव यांनी गणेश विसर्जन मार्गाची पाहणी केली आणि बंदोबस्ताविषयी परिस्थिती जाणून घेतली. रविवारी गणेश विसर्जन होणार असल्यामुळे पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात विसर्जन मिरवणूक बंदोबस्ताचे नियोजन केले. यासाठी अमरावतीवरून सीआरपीएफ, एसआरपीएफच्या कंपनी, सहा पोलिस उपअधीक्षक, १७ पोलिस निरीक्षक, एपीआय आणि पीएसआय ८३, पोलिस कर्मचारी ७७३, होमगार्ड ४९२, सीआरपीएफ कंपनी, एसआरपीएफ कंपनी आरसीपी प्लाटून आणि क्यूआरटी प्लाटून बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आले आहेत. तसेच शहरात सात फिक्स पॉइंटही लावण्यात आले आहेत.
गणेशविसर्जनासाठीरविवारी शहरातून मिरवणूक निघणार असल्याने वाहतूक मार्गात बदल केला आहे. अकोला ते अकोटकडे जाणारी वाहतूक बसस्थानक ते भगतसिंग चौकमार्गे वाशीम बायपास ते शेगाव टी पॉइंट येथून गायगाव, निंबा फाटामार्गे देवरी अकोट जुने शहर भागातून जाणारी येणारी वाहतूक डाबकी रोड, जुने शहर, भांडपुरा चौक, पोळा चौक, किल्ला चौक, हरिहरपेठ, वाशीम बायपास चौक, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ते लक्झरी स्टँड, सरकारी बगिचा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून अशोक वाटिका ते एसटी स्टँडकडे वळवण्यात आली आहे. सुभाष चौक ते ताजनापेठ ते गांधी चौकाकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्ग सुभाष चौक, दामले, अग्रसेन, टॉवर, बसस्टँड चौक, असा राहील.

पर्यायी मार्ग असे
सुभाषचौक ते ताजनापेठ ते गांधी चौकाकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्ग सुभाष चौक, दामले चौक, अग्रसेन चौक, टॉवर चौक, बसस्टँड चौक, असा राहील.

मार्ग तात्पुरता बंद
अकोलाशहर, आकोट, दहीहांडा आजूबाजूच्या ग्रामीण भागातील गणपती मंडळे गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पुलावर गणेशमूर्तींचे विसर्जन करतात. त्यामुळे अकोट ते अकोला मार्ग रविवारी सकाळी ते सोमवारी सकाळी वाजेपर्यंत तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे

डीवायएसपी {पोलिस निरीक्षक {एपीआय-पीएसआय २९ {पोलिस कर्मचारी ३४३ {होमगार्ड १७४ सीआरपीएफ कंपनी {एसआरपीएफ कंपनी {४ आरसीपी प्लाटून आणि क्यूआरटी प्लाटून