आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ganesh Immersed The Procession Violence; Four Injured

गणेश विसर्जन मिरवणुकीत हाणामारी; चार गंभीर जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून वाद होऊन दोन वेगवेगळ्या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी एक घटना माेठी उमरीतील विठ्ठलनगरात रात्री ९.३० वाजता, तर दुसरी महाकालीनगरात रात्री १० वाजता घडली.
मोठी उमरीतील विठ्ठलनगरात सोमवारी सायंकाळी गणेश विसर्जन मिरवणूक निघाली होती. रात्री वाजताच्यादरम्यान पवन दादाराव गलगले (वय २२) हा नाचत असताना अचानक काही युवकांनी त्यास मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचा भाऊ श्याम गलगले हा वाचवण्यासाठी गेला असता त्यालासुद्धा लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. मारहाणीची घटना घडल्याची वार्ता परिसरात पसरली. त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते. मिरवणुकीतसुद्धा खोळंबा निर्माण झाला होता. लोकप्रतिनिधींनी धाव घेत शांततेचे आवाहन केले. पोलिसांनी धाव घेत जखमींना सर्वोपचार रुग्णालयात भरती केले. पवन गलगलेच्या डोक्याला जबर मार लागला आहे. सिव्हिल लाइन पोलिस
ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान धीरज बाळकृष्ण मेश्राम, सूरज मेश्रामसह अन्य पाच ते सहा जणांनी लाठ्या- काठ्यांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, तर दुसऱ्या घटनेत मोठी उमरीतील महाकालीनगरात उमेश दयाराम निंबोकार हा रस्त्यात उभा असताना गजानन रामचवरे, लल्ला उर्फ आकाश रामचवरे अन्य दोघांनी त्यास रॉडने मारहाण केली. उमेशची आई सरला हिलासुद्धा मारहाण केली. जखमींना सर्वाेपचारमध्ये वॉर्ड क्रमांक १२ मध्ये भरती केले आहे. दरम्यान, सर्वोपचार रुग्णालयात दोन्ही घटनांतील जखमींना भरती करण्यात आले.

डाॅक्टरांचे दुर्लक्ष
सर्वोपचार रुग्णालयात दोन्ही घटनांतील जखमींना भरती करण्यात आले. एमएलसी केस असल्याने उपस्थित डॉक्टरांनी जखमींच्या उपचारास विलंब केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. जखीमींची परिस्थिती गंभीर असतानाही पाेलिस अाल्याशिवाय उपचार करणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे जखमींचे नातेवाइक संतापले हाेते.

पाेलिसांना विलंब
अकोटयेेथील विसर्जन मिरवणुकीसाठी सिव्हिल लाइन पोलिस ठाण्याचे निरीक्षक तथा अन्य पोलिस कर्मचारी गेले होते. त्यामुळे येथे पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाला. त्यामुळे या भागात राडा झाल्याची चर्चा शहरात पसरली होती. पाेलिस असते तर हा प्रकार घडलाच नसता, अशी चर्चा नागरिकांमध्ये हाेती.


---------------------