आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाडक्या बाप्पाला दिला भक्तिभावाने निराेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - दहादिवसांच्या मुक्कामानंतर लाडक्या बाप्पांना गुरुवार, १५ सप्टेंबर रोजी भक्तांनी मोठ्या उत्साहात निरोप दिला. पर्यावरणपूरक आगमन, आरास, उत्सव झाल्यानंतर आता बाप्पांना निरोपही पर्यावरण पूरक पद्धतीने देण्यात यावा, या उद्देशाने दैनिक दिव्य मराठीच्या वतीने पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात शहरातील विविध संस्था सहभागी झाल्या. शहरातील विविध भागात जवळपास पाच हजार गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. महापौर उज्वला देशमुख यांच्या वतीने शिवाजी पार्क, उपमहापौर विनोद मापारी मित्र परिवाराच्या वतीने रिंग रोड येथील छत्रपती उद्यान, अजय गावंडे मित्र मंडळाच्या वतीने आदर्श कॉलनीतील आदर्श उद्यान, डाबकी रोड येथील श्री रेणुका माता मित्र मंडळ, समाजसेवा बिछायत केंद्र आणि जिजामाता मित्र मंडळ यांच्याद्वारे संयुक्तरित्या क्रांती चौक येथे छाया हॉस्पिटलजवळ, गड्डम प्लॉट येथील लोकमान्य गणेशोत्सव मंडळाच्या वतीने बिर्ला रोड येथील प्रकाश किराणा दुकानाजवळ, शिवराय बाल गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने रेणुकानगर येथील काळ्या पाण्याच्या टाकीजवळ, शिवा मोहोड यांच्या वतीने संत तुकाराम चौक, आदर्श बाल गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गोडबोले प्लॉट येथे ईको फ्रेंडली गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली. तसेच या सर्व ठिकाणी निर्माल्य टाकण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. या सर्व ठिकाणी अकोलेकर गणेश भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग घेत लाडक्या बाप्पाला पर्यावरणपूरक पद्धतीने निरोप दिला.
छत्रपतीउद्यानात मंगलमय वातावरणात निरोप
रिंगरोड येथील छत्रपती उद्यानात उपमहापौर विनोद मापारी आणि दैनिक दिव्य मराठी यांच्या वतीने तयार केलेल्या ईको फ्रेंडली गणेश घाटावर प्रचंड प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. परिसरातील नागरिकांच्या घरातील लहान मूर्तींप्रमाणेच मंडळांचे काही मोठे गणपतीही येथे विसर्जित करण्यात आले. दहा दिवस घरातील सदस्यांप्रमाणे असलेल्या बाप्पाला संपूर्ण कुटुंबाने मोठ्या उत्साहात, भक्तीभावाने निरोप दिला. तुतारीचा गजर, ठिकठिकाणी होणारी फुलांची उधळण आणि अत्यंत मंगलमय वातावरणात बाप्पांना येथे निरोप देण्यात आला.

मुख्य रस्त्यावरून आत प्रवेश करताना बँडच्या गजरात बाप्पाचे स्वागत करण्यात आले. या मार्गात ठिकठिकाणी पारंपारिक वेशभूषेतील मुलींनी बाप्पांच्या मूर्तीवर पुष्प वर्षाव केला. उद्यानाच्या प्रवेशद्वारावर मुलींनी बाप्पांचे पूजन केले. तेथून आत प्रवेश केल्यानंतर एका ठिकाणी आरती, पूजा करण्यासाठीवेगळी व्यवस्था करण्यात आली. दुसरीकडे निर्माल्य टाकण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. या निर्माल्यापासून खताची निर्मिती करण्यात येणार आहे.

गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी ते फुटांचे आठ कुंड तयार करण्यात आले. या कुंडात केवळ मातीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. दुसऱ्या बाजूला एक मोठा फुटांचा कुंड तयार करून त्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. परिसरातील नागरिकांनी सहकुटुंब येथे येऊन मोठ्या चैतन्यमय वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात आला. सकाळी सात वाजेपासून तर रात्री आठ वाजेपर्यंत जवळपास हजारांपेक्षा अधिक मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. या उपक्रमात उपमहापौर विनोद मापारी यांच्यासह कुणाल शिंदे, पुरुषोत्तम गावंडे, अनिल कट्यारमल, विशाल देशमुख, अक्षय गणोजे, सागर गावंडे, सुरेश भुसारी, भास्कर, सोनू भालेराव, अक्षय चतरकर, अंकुश ढोरे, छाया काकडे, अक्षय बालटे, संग्राम इंगळे, शरद बनसोड, राजू टिकार, श्रीहरी टाले, निवृत्ती तिजारे, गजानन भगत, प्रशांत लांडे, मंगेश भुयारकर, मंगेश बोंडे यांच्यासह जवळपास १०० सहकारी, परिसरातील चिमुकल्यांनी सहकार्य केले. या ठिकाणी महापौर उज्वला देशमुख, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, महापालिका आयुक्त अजय लहाने, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी भेट दिली.

अकोला. शुक्रवार १६ सप्टेंबर, २०१६
शिवराय गणेशोत्सव मंडळ : रेणुकानगरातीलकाळ्या पाण्याच्या टाकीजवळ शिवराय बाल गणेशोत्सव मंडळातर्फे इको फ्रेंडली गणेश विसर्जनाची व्यवस्था केली. येथे जवळपास ५० मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. येथे उज्वल देशमुख, शैलेष राजगुरे, पवन घाटोळे, अनिकेत घाटोळे, ऋषी भोयर, प्रफुल्ल करांगळे, ऋषी सोळंके, अभि राजगुरे, ओम घाटोळे, पंकज टेकाडे, सचिन बानाईत, कौस्तुभ देशमुख, आशुतोष मोहरीर, प्रकाश गजघाटे, निखील क्षीरसागर सहभागी झाले.

शिवाजी उद्यान : महापौरउज्वला देशमुख यांच्यातर्फे विसर्जनाची व्यवस्था केली. यात सोनूभाऊ देशमुख, पप्पू गुंजाळ, नितीन अंदयाल, संजय गायकवाड, प्रदीप लुगडे, मधू बर्डे, घनश्याम ठाकूर, आकाश मोरे, केशव इंगळे, निर्मला पांडव, ज्योत्स्ना शिंदे, चंदा देशमुख, थिटे, मोरे, कल्पना देशमुख, किशोर बुंदेले, संदीप बाहेती, श्याम दुबे यांनी सहभाग घेतला.
डाबकी रोड : श्रीरेणुका माता मित्र मंडळ, समाजसेवा बिछायत केंद्र जिजामाता मित्र मंडळ यांच्याद्वारे क्रांती चौकात पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश विसर्जन केले. यात रेशू मालपाणी, बाळू धुरळकर, मुकूंद गिरी, प्रदीप निपाळे, संदीप वाणी, प्रवीण निनोरे, नितीन देशमुख, मंदार जोगळेकर, कविता देशमुख, सुषमा गिरी, श्रद्धा जोगळेकर, गौरव गिरी, अमिता चोपडे अादी सहभागी झाले.

विविध कार्यक्रमांची रेलचेल : उपमहापाैरांनीविविध कार्यक्रमांचे अायाेजन केले हाेते. यात सकाळी प्रशांत खोडवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे भजन, रमेश थोरात यांच्या विनोदी एकपात्री प्रयोग, जीवन देशमुख यांचे “कला हसत खेळत जगण्याची’ या विषयावर व्याख्यान, तसेच रांगोळी कला प्रदर्शन, वन मिनीट गेम, उखाणे स्पर्धा अशा विविध स्पर्धांही घेतल्या.
बिर्ला रोड : गड्डमप्लॉट येथील लोकमान्य गणेशोत्सव मंडळाच्या वतीने बिर्ला रोड येथील प्रकाश किराणा दुकानाजवळ ईको फ्रेंडली गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली. येथे देवानंद टाले आणि मित्र मंडळाने सहकार्य केले. परिसरातील नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन ५० गणेशमूर्तींचे येथे विसर्जन केले.

आदर्श उद्यान : अजयगावंडे मित्र मंडळाच्या वतीने आदर्श कॉलनीतील आदर्श उद्यान येथे पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश विसर्जन करण्यात आले. नगरसेविका कल्पना गावंडे, अजय गावंडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. अत्तर, फुलांच्या वर्षावात स्वागत, पारंपरिक वाद्यांचा गजरात भक्तीभावाने निरोप देण्यात आला.
अमृत कलशच्या चिमुकल्यांचा पुढाकार : अमृतकलश विद्यालयाच्या ४० विद्यार्थिनींनी नागरिकांना पत्रकातून विसर्जनाचे महत्त्व सांगितले. शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक म्हणून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, आयुक्त अजय लहाने यांनी सत्कार केला. शाळेच्या संचालिका पल्लवी कुळकर्णी, कुशल सेनाड, शरद वाघ, अक्षय कापडे, अंकुश गावंडे, योगेश पुसदकर यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.

आदर्श बाल गणेशोत्सव मंडळ
गोडबोले प्लॉट येथील चिमुकल्या मुलांनी पुढाकार घेत आदर्श बाल गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मूर्ती विसर्जनाची व्यवस्था केली. या ठिकाणी ५० गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. या उपक्रमात ओम उदगीरकर, प्रसाद देशमुख, सौरभ देशमुख, शाश्वत जानोरकर, यश वाघोळे, हार्दीक सेदानी, सोहम शेलकर, सोहम सुर्यवंशी यांच्यासह अनेक मुलांनी सहभाग घेतला.

पुढील वर्षीसाठी केला संकल्प
उपमहापौर विनोद मापारी यांनी स्वत: नागरिकांना शाडू मातीचे गणपतीचे महत्त्व पटवून दिले. पुढच्या वर्षी कार्यशाळेत मूर्ती तयार करून त्याचीच स्थापना करण्याचा संकल्प करून घेतला. तसेच पुढच्या वर्षीपासून दरवर्षी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.
अकाेलेकरांसह अनेक संस्था, संघटनांचा सहभाग
धाे-धाे बरसणाऱ्या सरींच्या साक्षीनं दहा दिवसांपासून विराजमान झालेल्या गणरायाचे गुरुवारी विसर्जन करण्यात अाले. दैनिक दिव्य मराठी अाणि शहरातील अनेक संस्थांनी एकत्र येत पर्यावरणपूरक गणेशाेत्सव साजरा करण्यासाठी एक अभियान राबवले हाेते. या अभियानाला अकाेलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला.
शिव हेल्थ क्लब
संततुकाराम चौक येथे शिव हेल्थ क्लबच्या वतीने पर्यावरणपूरक गणेश विसर्जन हौदाची व्यवस्था करण्यात आली. या ठिकाणी जवळपास ३०० लहान मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. या उपक्रमात शिवा मोहोड, सागर मोहोड, राम इंगळे, संगम मोहोड, किरण गावंडे, शिवम चित्तलवार, मयूर शिंदे, आकाश शिरसाट, ऋषीकेश तायडे, श्रीकांत खंडारे, अभिषेक खंडारे, अभिजीत ढोरे, चंदन गिरी, प्रथमेश देशमुख, शिवम शेंडे यांच्यासह अनेक युवक सहभागी झाले.
बातम्या आणखी आहेत...