आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

886 पाेलिसांची राहणार गणेश विसर्जन मिरवणुकीवर नजर; अधिका-यांनी घेतल्‍या बैठका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी तगडा बंदाेबस्त तैनात करण्यात अाला असून, यापृष्ठभूमीवर साेमवारी वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांनी बंदाेबस्तात सहभागी हाेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानंतर गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरुन पाेलिसांनी पथसंचलन केले. बंदाेबस्तात एकूण ८८६ अधिकारी-कर्मचारी सहभागी हाेणार अाहेत. 
 
गणेशाेत्सवादरम्यान काेणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी तगडा पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात अाला हाेता. मंगळवारी निघाणाऱ्या विसर्जन मिरवणुकीसाठी बंदाेबस्त तैनात करण्यासाठी पाेलिस अधीक्षक कार्यालयाने सर्व पाेलिस स्टेशन इतर शाखांकडून अधिकारी कर्मचाऱ्यांची माहिती मागितली हाेती. त्यानुसार बंदाेबस्त निश्चित करण्यात अाला. 
साेमवारी बंदाेबस्ताबाबत पाेलिस अधीक्षक राकेश कला सागर, अतिरिक्त पाेलिस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पाेलिस अधीक्षक उमेश माने, पाेलिस उपअधीक्षक सुभाष माकाेडे यांनी सूचना दिल्या. 
 
१४ कॅमेऱ्यांचा वाॅच : गणेशिवसर्जन मिरवणूक मार्गावर एकूण १४ कॅमेऱ्यांचा वाॅच राहणार अाहे. यामध्ये काळा माराेती वळण, विर हनुमान चाैक, अाेसवाल मंगल कार्यालयाजवळ, अकाेट स्टंॅड, तेलीपुरा चाैक, मच्छी मार्केट, काेठडी बाजार, गांधी चाैक ते महाराणा प्रताप चाैक (सिटी काेतवाली), गणेश गाट येथे कॅमेरा राहणार अाहेत. तसेच अतििरक्त पाेलिस अधीक्षक, दाेन उपअधीक्षकांसाेबत कॅमेरामन राहणार अाहेत. 
 
एसअारपीएफचे जवानही राहणार तैनात : गणेश विसर्जन मिरवणुकीत राज्य राखीव पाेलिस दलाची एक प्लाटून कार्यरत राहणार अाहे. या जवांनी अाठ ठिकाणी नेमणूक करण्यात येणार अाहे. यामध्ये वीर हनुमान चाैक ते शाहीजामा मशिद, माळीपुरा चाैक, अाकाेट स्टॅंड, सुभाष चाैक, तेलीपुरा चाैक, कच्छि मशिद (ताजनापेठ), सराफ बाजार चाैक अादी ठिकाणांचा समावेश अाहे. 
 
महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारीही दिसणार रस्त्यावर 
गणेशविसर्जन मिरवणुकीदरम्यान पुरेसा पोलिस बंदोबस्त राहणार असला तरी महसूलचे अधिकारी-कर्मचारीही रस्त्यावर दिसून येणार आहे. कायदा सुव्यवस्था राखणे ही जिल्हा प्रशासनाची संयुक्त जबाबदारी आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी आज दुपारी एक आदेश जारी करुन सुमारे ४० कर्मचारी सर्व उपजिल्हाधिकारी यांना कर्तव्य बजावयास सांगितले आहे. 
 
सेक्टरचा समावेश 
गणेशिवसर्जन मिरवणूक मार्ग पाेलिस बंदाेबस्ताच्या दृष्टीने सेक्टरमध्ये विभाजित करण्यात अाला अाहे. या सेक्टरनिहाय पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात अाला अाहे. किल्ला चाैक ते दगडीपूल, दगडीपूल ते मामा बेकरी, मामा बेकरी ते अाकाेट स्टंॅड, अाकाेट स्टंॅड ते सुभाष चाैक, सुभाष चाैक ते तेलीपुरा चाैक, तेलीपुरा चाैक ते केएमटी हाॅल, केएमटी हाॅल ते काेठडी बाजार, काेठडी बाजार ते गांधी चाैक अािण गांधी चाैक ते गणेश घाट असे नऊ सेक्टर तयार करण्यात अाले अाहेत. 

हाेमगार्ड महिला 
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी प्रभारी अधिकारी म्हणून अतिरिक्त पाेलिस अधीक्षक विजयकांत सागर यांची नियुक्ती करण्यात अाली असून, सहाय्यक म्हणून शहर पाेलिस उपअधीक्षक उमेश माने उपअधीक्षक सुभाष माकाेडे काम पाहणार अाहेत. 
बातम्या आणखी आहेत...