आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरच्या घरी गणपती विसर्जनास भाविकांचा लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पर्यावरण पूरकतसेच मातीच्या गणपतीची स्थापना करण्यासाठी "दिव्य मराठी'ने केलेल्या आवाहनाला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर "आपल्या बाप्पाचे विसर्जन करा आपल्याच घरी' या आवाहनालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शेकडो वाचकांनी या अभियानात सहभागी झाल्याची माहिती "दिव्य मराठी'ला दिली आहे.

पर्यावरणासाठी "दिव्य मराठी'ने मातीच्या गणपतीची स्थापना करण्याचे आवाहन वाचकांना केले होते. यासाठी विविध ठिकाणी मातीचे गणपती बनवण्याचे प्रशिक्षण शिबिरेही घेतली. या आवाहनाला प्रतिसाद देत वाचकांनी घरी मातीच्या गणपतीची स्थापना केली, तसेच पर्यावरणपूरक देखावाही साकारला होता. त्यानंतर "आपल्या बाप्पाचे विसर्जन करा आपल्याच घरी' असे आवाहन केले होते. त्यानुसार गणरायांचे घरीच विसर्जन करून त्याचे छायाचित्र "दिव्य मराठी'ला पाठवले. या आवाहनाला मिळालेला प्रतिसाद पाहता सर्वांची नावे प्रसिद्ध करणे शक्य नाही. त्यासाठीच काही वाचकांची नावे प्रातिनिधिक स्वरूपात देत आहोत, त्यात शिवसेना उपतालुकाप्रमुख सुनील डुकरे, योगेश जयस्वाल, विजय निलखन, विक्रांत तराळे, कांचन दुर्गे, आनंद जागीरदार, मनोज सुभेदार, नितीन देशमुख, प्रदीप वानखेडे, समीर माहुलकर, प्रशांत जुनगडे, पवन राठोड, विष्णू गोटे, अनिल शुक्लांचा समावेश आहे.

डाबकीरोडवर घरगुती गणेश विसर्जन व्यवस्था : दरम्यान,"दिव्य मराठी'च्या आवाहनावरून डाबकी रोडवरील समर्थ महिला बचत गट, समाजसेवा मित्र मंडळ गणेशोत्सव आणि रेणुका माता मित्र मंडळ यांनी श्रीराम टॉवर येथे परिसरातील घरगुती गणपती विसर्जनासाठी टाक्यांची व्यवस्था केली होती. या उपक्रमात समर्थ महिला बचत गटाच्या पूर्वा पाटेकर, छाया ठाकरे, सरोज पाटखेडे, निर्मला नंदनवार, आशा जाधव, पूजा दाभाडे यांनी पुढाकार घेतला.