आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुसरबीड येथे गॅस सिलिंडरचा झाला स्फोट; जीवितहानी टळली, ११ लाखांचे नुकसान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंदखेडराजा- घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन जवळपास ११ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना गुरुवार, १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता तालुक्यातील दुसरबीड येथे घडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.

तालुक्यातील दुसरबीड येथील वॉर्ड क्रमांक चे ग्रामपंचायत सदस्य साहेबराव येडुजी ढवळे यांचा मुलगा शिवाजी वय २५ हा सायंकाळी ५.३० च्या सुमारास चहा बनवण्यासाठी स्वयंपाक घरात गेला होता. त्यावेळी त्याने गॅस सुरू केला असता अचानक गॅसचा भडका उडाला. त्यामुळे शिवाजीने तत्काळ घरातून बाहेर धाव घेतली. त्यानंतर काही वेळातच या पेटलेल्या सिलिंडरचा स्फोट झाला. यावेळी सुदैवाने घरात कोणीच नव्हते. परंतु सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत घरातील टीव्ही, फ्रीज, कपाट, भांडी, वॉशिंग मशीन, कूलर जळून खाक झाले. या घटनेत जवळपस एक लाख रुपयाचे नुकसान झाले. तसेच दहा लाख रुपये किमतीच्या स्लॅबला तडे जाऊन तो सुद्धा फुटला. या घटनेत घर मालकाचे जवळपास ११ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सिलिंडरच्या स्फोटामुळे जवळपासच्या घरांना देखील हादरा बसला आहे. सिलिंडर स्फोटाचा आवाज येताच नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. त्यामुळे नागरिकामध्ये एकच भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच बीट जमादार अशोक मांटे तसेच तलाठी संजय चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आहे.

बातम्या आणखी आहेत...